मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता थेट ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उतरण्याचे ठरवले आहे. राज्यातील सर्व म्हणजे चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा आदेश पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मात्र, यावर शिवसेना नेते व आमदार राजन साळवी यांनी, मनसेला निवडणूक लढऊ द्या, पण शून्य जागा त्यांच्या निवडणूक येतील, असे म्हटले आहे.
मनसेच्या झिरो जागा निवडूण येतील -
मनसे ग्रामपंचायत निवडणूक लढणार यावर बोलताना शिवसेना नेते राजन साळवी यांनी म्हटले की, महाराष्ट्रात शिवसेना ग्रामपंचायतीच्या निवडणुका सर्व लढवणार आहे आणि त्यामध्ये यश देखील प्राप्त करेल. निवडणुकीत मनसे काही करिष्मा करणार नाही. आम्हाला कुणाचंच आव्हान नाही. मनसेला शुन्य जागा निवडून येतील, असे साळवी यांनी म्हटले आहे.
मनसेचा करिष्मा चालणार नाही
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मनसेने आपल्या धोरणात अमुलाग्र बदल केले आहेत. शिवसेनेची कोंडी करण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाने आता ग्रामीण भागातही लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. राज्यातील सुमारे चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यात सर्वच पक्षांबरोबर मनसे ही उतरणार म्हटल्यावर चर्चा झाली आहे. त्यात शिवसेना नेत्यांनी मनसेवर टीका केली आहे.