मुंबई: मनसेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टेलिकॉम सेनेची कार्यकारणी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आल्याने मनसेत पक्षांतर्गत चर्चांना उधाण आलं आहे. (MNS Telecom Sena executive dismissed). यानंतर लवकरच टेलिकॉम सेनेची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात येईल असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जारी करण्यात आलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे. (New MNS executive)
अध्यक्ष वगळता संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त: मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या सहीने जारी करण्यात आलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने या पत्राद्वारे सूचित करण्यात येते की, महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर यांच्या पदाव्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल.
मनसे पूर्ण ताकदीने मैदानात: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्यासोबतच महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी राज ठाकरेंनी केली आहे. स्थानिक स्वायत्त संस्थांमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र मनपाच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे मानले जात आहे.