ETV Bharat / city

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला मनसेचे सडेतोड उत्तर

मेट्रो कारशेडसाठी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून कौतूक केले. यावर अखिल चित्रे यांनी अमिताभ बच्चन यांच्या मेट्रो समर्थानाच्या ट्विटला प्रतिक्रिया देत, 2010मध्ये मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन नवीन सरकार आल्यावर मेट्रोला कसे पाठिंबा देत आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे. बच्चन यांनी मेट्रो विषयी केलेले ट्विट पुढे आणखी काही दिवस वादग्रस्त ठरणार आहे असेच चित्र दिसत आहे.

mumbai
author img

By

Published : Sep 18, 2019, 2:32 PM IST

मुंबई- मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीबाबत वाद सुरू असतानाच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे कौतुक केले. मुंबई मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील वृक्षतोडीला अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काल अप्रत्यक्ष समर्थन केल्यानंतर मनसेने आज कडाडून विरोध केला आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी कार्टून काढून, 2010 मध्ये मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन नवीन सरकार आल्यावर मेट्रोला कसे पाठिंबा देत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे असे म्हणत मनसे नेते चित्रे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया देताना मनसे नेते अखिल चित्रे

अमिताभ बच्चन आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते, “माझ्या एका मित्राला तात्काळ दवाखान्यात जायचं होतं. त्याने कारऐवजी मेट्रोने जाणे पसंद केले. तो उपचार घेऊन घरी परतला तेव्हा तो खूप प्रभावित झाला होता. त्याने मेट्रो खूप जलद, सोयीस्कर आणि उपयुक्त असल्याचे म्हटले.”

बच्चन आपल्या ट्विटमध्ये मेट्रोची उपयुक्तता सांगून तेवढ्यावरच थांबले नव्हते. त्यांनी मेट्रोचा, प्रदुषणाचा आणि झाडांचाही संबंध जोडला. ते म्हणाले, “प्रदूषणावर उपाय म्हणजे अधिक झाडे लावा. मी आमच्या घराच्या बागेत झाडे लावली आहेत, तुम्ही लावलीत का?” यातून बच्चन यांनी अप्रत्यक्षरित्या मेट्रोच्या कामासाठी आरेतील जंगलतोडीलाच पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या या भूमिकेनंतर मुंबई मेट्रो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मेट्रो प्रोजेक्ट प्रमुख अश्विनी यांनी बच्चन यांचे ट्विट रिट्विट करत कौतुक केले आहे. पर्यावरण प्रेमी व मुंबईकर मेट्रोला विरोध करत असताना अमिताभ बच्चन यांचे हे ट्विट मोठे वादग्रस्त ठरत आहे. कारण या मेट्रो कारशेड मुळे मुंबईचे फुफ्फुस असलेले आरे जंगल नष्ट होणार आहे. त्यामुळे इतके चांगले अभिनेते व अभ्यासू असूनदेखील अमिताभ बच्चन यांची ही प्रतिक्रिया अनेकजणांना रूचलेली नाही.

यावर अखिल चित्रे हे अमिताभ बच्चन यांच्या मेट्रो समर्थानाच्या ट्विटला प्रतिक्रिया देत म्हणाले की, 2010मध्ये मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन नवीन सरकार आल्यावर मेट्रोला कसे पाठिंबा देत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. इतकी लोकं विरोध करत असताना बच्चन यांचं ट्विट हे दुर्दैवी आहे तसेच त्यांनी घरी झाडे लावायला सांगितलेल्या उद्देशावर चित्रे पुढे म्हणाले “घराच्या परिसरात झाड लावणे हा निसर्गातील जंगलांना पर्याय होऊ शकत नाही. वास्तव कल्पनेपेक्षा विचित्र असते.”
यामुळेच बच्चन यांनी मेट्रो विषयी केलेले ट्विट पुढे आणखी काही दिवस वादग्रस्त ठरणार आहे असेच चित्र दिसत आहे.

Intro: अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला मनसेचे उत्तर

मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीबाबत वाद सुरू असतानाच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे कौतुक केले आहे. मुंबई मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील वृक्षतोडीला अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काल अप्रत्यक्ष समर्थन केल्यानंतर मनसेने आज कडाडून विरोध केला आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी कार्टून काढून, 2010 मध्ये मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन नवीन सरकार आल्यावर मेट्रोला कसे पाठिंबा देत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे असे म्हणत मनसे नेते चित्रे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

अमिताभ यांचं ट्विट

अमिताभ बच्चन आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते, “माझ्या एका मित्राला तात्काळ दवाखान्यात जायचं होतं. त्याने कारऐवजी मेट्रोनं जाणं पसंद केलं. तो उपचार घेऊन घरी परतला तेव्हा तो खूप प्रभावित झाला होता. त्यानं मेट्रो खूप जलद, सोयीस्कर आणि उपयुक्त असल्याचं म्हटलं.”

बच्चन आपल्या ट्विटमध्ये मेट्रोची उपयुक्तता सांगून तेवढ्यावरच थांबले न्हवते. त्यांनी मेट्रोचा, प्रदुषणाचा आणि झाडांचाही संबंध जोडला. ते म्हणाले, “प्रदूषणावर उपाय म्हणजे अधिक झाडं लावा. मी आमच्या घराच्या बागेत झाडं लावली आहेत, तुम्ही लावलीत का?” यातून बच्चन यांनी अप्रत्यक्षरित्या मेट्रोच्या कामासाठी आरेतील जंगलतोडीलाच पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे.

विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या या भूमिकेनंतर मुंबई मेट्रो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मेट्रो प्रोजेक्ट प्रमुख अश्विनी यांनी बच्चन यांच ट्विट रिट्विट करत कौतुक केलं आहे.

पर्यावरण प्रेमी व मुंबईकर मेट्रोला विरोध करत असताना अमिताभ बच्चन यांचं हे ट्विट मोठं वादग्रस्त ठरत आहे. कारण या मेट्रो कार शेड मुळे मुंबईच फुफ्फुस असलेला आरे जंगल नष्ट होणार आहे. त्यामुळे इतके चांगले अभिनेते व अभ्यासू असून देखील अमिताभ बच्चन यांचीही प्रतिक्रिया अनेकजणांना पटलेली नाही.

यावर अखिल चित्रे यांनी अमिताभ बच्चन यांच्या मेट्रो समर्थानाच्या ट्विटला प्रतिक्रिया देत म्हणाले की,2010 मध्ये मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन नवीन सरकार आल्यावर मेट्रोला कसे पाठिंबा देत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. इतकी लोकं विरोध करत असताना बच्चन यांचा ट्विट हे दुर्दैवी आहे तसेच त्यांनी घरी झाडं लावायला सांगितलेल्या उद्देशावर चित्रे पुढे म्हणाले “घराच्या परिसरात झाड लावणं हा निसर्गातील जंगलांना पर्याय होऊ शकत नाही. वास्तव कल्पनेपेक्षा विचित्र असते.”

यामुळेच बच्चन यांनी मेट्रो विषयी केलेलं ट्विट पुढे आणखी काही दिवस वादग्रस्त ठरणार आहे असेच चित्र दिसत आहे.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.