ETV Bharat / city

MNS rally canceled : मुसळधार पावसामुळे मनसेचा मेळावा रद्द, 'पुरसदृश्य भागात मदतकार्य करा' राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

author img

By

Published : Jul 13, 2022, 7:59 AM IST

राज्यातील सत्तासंघर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना दूर राहिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Health of Raj Thackeray ) हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय दिसून आले नाहीत. अशा स्थितीत मनसेने १३ जुलैला होणारा मेळावा रद्द केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय गोंधळानंतर ( political turmoil in Maharashtra ) मुंबईतील राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray ) यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनसेचा मेळावा 13 जुलै रोजी वांद्रे येथील रंगशारदा हॉलमध्ये ( Rangsharda Hall in Bandra ) होणार होता. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र जारी करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. राज ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांना पत्र लिहून हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे.

पुढची तारीख लवकरच ठरवली जाईल- मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray letter to party workers ) यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, १३ जुलैला रॅली होणार होती. ज्यामध्ये मला तुमच्याशी बोलायचे होते आणि कामाबाबत काही सूचना द्यायची होती. मात्र, कालपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. सार्वजनिक जीवन व्यस्त आहे, त्यामुळे सभा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख लवकरच ठरवली जाईल, त्यामुळे तुम्हा सर्वांना कळवण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले आहे.

मनसे अध्यक्षांचे पत्र
मनसे अध्यक्षांचे पत्र

पुढची तारीख लवकरच सांगितली जाईल-'तुम्हाला जरा थोड्या तातडीनं कळवतो आहे. आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होते. कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाने थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो. तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणे फार अवघड आहे. अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन, तुम्हा सर्वांना कळवली जाईलच.

स्वतःची काळजी घ्या- 'तुम्ही स्वत:ची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे. तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यत: नदीकाठाला जिथे लोक रहात
आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी बुसण्याची सण्याची शक्‍यता आहे. सांगली- कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकते. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुध्द पाणी, अंथरूण-पांघरूण पुरवावे लागेल. मुख्यत: वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडे उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील. अशा खूप गोष्टी आहेत. एक लक्षात घ्या की अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका. अर्थात, असं काही होऊ नये, कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं. लवकरच भेटू.' दरम्यान, भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्याची राजधानी मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शिंदे गटाच्या आमदाराने राज ठाकरेंची घेतली होती भेट-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंडखोरी करून शिवसेनेच्या जवळपास 40 हून अधिक आमदारांना गुवाहाटीचे दर्शन घडवले. सध्या बंडखोर गट शिवसेनेवर दावा करत असला तरी सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या बंडखोर गटाला एक तर भाजप किंवा बच्चू कडू यांचे प्रहार संघटना अथवा राज ठाकरे यांच्या मनसेत विलीनीकरण व्हावं लागेल, असं बोललं जात आहे. त्यातच आज ( 6 जुलै ) बंडखोर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानं या चर्चांना ( Sada Sarvankar Meets MNS Chief Raj Thackeray ) दुजोरा मिळत आहे.

हेही वाचा-Eknath Shinde called Raj Thackeray : एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना केला फोन, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर झाली चर्चा

हेही वाचा-Raj Thackeray : "माणूस नशिबाला कर्तृत्व समजू लागल्यावर ऱ्हासाकडे..."; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचा निशाणा

हेही वाचा-Raj Thackeray : शिंदे गट मनसेत सामील होणार?, बंडखोर आमदाराने राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चेला उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.