ETV Bharat / city

'गर्व से कहो हम हिंदू है'चा नारा देत मनसेची शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी - शिवसेना भवन न्यूज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील आक्रमक भूमिका थेट शिवसेनेवरच टीका केली आहे. मनसेकडून दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर 'गर्व से कहो, हम हिंदू है' असा आशय लिहिला आहे. यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटोही छापण्यात आला आहे.

मनसे पोस्टरबाजी
मनसे पोस्टरबाजी
author img

By

Published : Oct 15, 2021, 2:05 PM IST

Updated : Oct 15, 2021, 2:27 PM IST

मुंबई - हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र निर्माण सेना शिवसेनेवर टीका करताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील आक्रमक भूमिका थेट शिवसेनेवरच टीका केली आहे. मनसेकडून दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर 'गर्व से कहो, हम हिंदू है' असा आशय लिहिला आहे. यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटोही छापण्यात आला आहे.

हेही वाचा - मनसे अन् मुंबई महापालिका आमने-सामने, हिंदू स्मशानभूमीतील खत प्रकल्पालावरू पेटला वाद

शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न

सेनाभवनासमोर हे पोस्टर लावून एकीकडे मनसे हिंदुत्वाचा नारा बुलंद करत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने हिंदूत्वापासून फारकत घेतली आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न या पोस्टरमधून होत आहे. शिवसेनेचा आज दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी मनसेने असे पोस्टर्स लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती तुटल्यानंतर शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करण्यात आली होती. कारण समविचार नसलेल्या पक्षांशी त्यांनी युती केली होती. तेव्हापासून शिवसेनेवर सातत्याने हिंदूत्वापासून फारकत घेतल्याची टीका होत आहे. दुसरीकडे जरी भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीबाबत प्रश्नचिन्ह असला तरीही दोघांच्या भूमिका समान आहे. यामुळे शिवसेनेच्या भूमिकेशी नाराज असलेल्या शिवसैनिकांना आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा - मनसे नेते बाळा नांदगावकर भेटले फडणवीसांना, मनसे-भाजप युतीची पुन्हा चर्चा

दादरसह इतर ठिकाणीही बॅनर्स

हिंदूसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्वाचे विचार हे मनसेप्रमुख राज ठाकरे पुढे घेऊन जाऊ शकतात आणि ज्या लोकांमध्ये धमक आहे तेच लोक म्हणू शकतात गर्व से कहो हम हिंदू है. आज हिंदुंचा मोठा सण आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा बॅनर लावला आहे आणि फक्त दादरमध्येच नाही तर प्रभादेवी, वरळी या ठिकाणीदेखील लावले आहेत, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले

Last Updated : Oct 15, 2021, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.