ETV Bharat / city

मनसेने प्रसिद्ध केला अमित ठाकरे यांचा कामाचा चढता आलेख

author img

By

Published : Jan 22, 2021, 3:21 PM IST

Updated : Jan 22, 2021, 3:32 PM IST

मनसेने व्हिडिओ ट्रेलरच्या माध्यमातून अमित ठाकरेच्या कामाचा चढता आलेख प्रसिद्ध केला आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरे यांचा चेहऱ्याचा वापर होईल, हे या चर्चेतून दिसत आहे.

Amit
Amit

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी मागील वर्षी सक्रिय राजकारणात भाग घेण्यास सुरवात केली. अमित यांचे वर्षभराचे रिपोर्ट कार्ड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जारी करण्यात आले आहे. अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी नियुक्ती होऊन वर्षपूर्ती होत आहे. त्याबाबत मनसेने व्हिडिओ ट्रेलरच्या माध्यमातून अमित ठाकरेच्या कामाचा चढता आलेख प्रसिद्ध केला आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरे यांचा चेहऱ्याचा वापर होईल, हे या चर्चेतून दिसत आहे.

मनसेने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमधील काही मुद्दे -

  • आरे आंदोलन

आरे कॉलनी म्हणजे मुंबईचा श्वास, मुंबईचा श्वास तोडण्याचे प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून केले जात होते. पर्यावरणाचा विचार करून मनसे नेते अमित ठाकरे यांनी या आंदोलनात स्वतः सहभाग घेत अनेक संघटनांच्या सहाय्याने हा मुद्दा निकालात काढला. राज्यातील बंधपत्रित डॉक्टर्स आणि परिचारिका (नर्सेस) यांच्या पगारातील कपात रद्द करण्याची मागणी मनसेच्यावतीने अमित ठाकरे यांच्या पुढाकाराने करण्यात आली.

  • फीच्या अडचणींची सोडवणूक

करोना संकटकाळात शाळांनी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांनी फी भरण्यात पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी समजून घ्यायला हव्यात. राज्याच्या मुख्यमंत्र्याना पत्र लिहून "पालकांकडून शाळांनी वाढीव फी घेऊ नये तसंच फी भरण्यासाठी पालकांवर कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव टाकला जाऊ नये, यासंदर्भात आपण स्वत: सर्व खासगी शाळांच्या व्यवस्थापनांशी संवाद साधून सध्याच्या संकटकाळात पालकांना दिलासा द्यावा" अशी मागणी मनसेच्या वतीने अमित ठाकरे ह्यांनी केली.

  • राजभाषेचा आग्रह

आपल्या महाराष्ट्राची 'राजभाषा' मराठी आहे, प्रशासनाची पत्रके हिंदी, इंग्रजी भाषेत येत होती. शासनआदेश मातृभाषेतून लोकांना कळावेत म्हणून मुख्य सचिवांना मनसेच्यावतीने अमित यांनी पत्र लिहिले.

  • आशा स्वयंसेविकांचा मोबदला वाढ

महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविकांना खूपच कमी मोबदला दिला जात होता. त्यांना मिळणारा मोबदला वाढायला हवा या मागणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह भेट घेतली. अजित पवार यांनी ही मागणी मान्य करत आशा स्वयंसेवकांच्या वेतनात दुप्पट वाढ केली.

  • बेड उपलब्धता

कोरोना काळात बेड उपलब्धता असल्याचे नागरिकांना कळावे ह्यासाठी "App" विकसित करून कोरोनाविषयक माहिती त्यावर प्रकाशित करावी, प्रत्येक रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत, पोलीस कर्मचाऱ्यांना राखीव बेड असावेत, अशा मागणीसाठी अमित यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली.

  • मानधनात कपात करण्याच्या निर्णयाचा विरोध

कोरोनाच्या लढाईत सगळ्यात जास्त जीव धोक्यात घालून लढणाऱ्या आरोग्य सेवकांच्या (बंधपत्रित डॉक्टर्स आणि नर्सेस) मानधनात कपात करण्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले.

Last Updated : Jan 22, 2021, 3:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.