मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह ( Brijbhushan Singh ) यांच्याविरोधात मनसेतर्फे आज दादर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मनसे ( MNS complaint ) पदाधिकारी व मसनेच्या जनहित कक्षाच्या वकिलांनी आज ही तक्रार दाखल केली. ब्रिजभूषण सिंह सातत्याने राज ठाकरेंवर खालच्या ( complaint against Brijbhushan Singh at Dadar police ) भाषेत टीका करत आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे, बृजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या ( Brijbhushan Singh complaint by mns mumbai ) वकिलांनी केली आहे.
खासदार बृजभूषण सिंग यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दादरमधील मनसे पदाधिकारी आणि मनसे जनहीत कक्षाच्या वकिलांनी दादर पोलीस ठाण्यामध्ये ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत खालच्या भाषेत वक्तव्य तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे मनसेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान आम्ही दिलेल्या तक्रार अर्जावर संपूर्ण चौकशी करून पुढील कारवाईची प्रक्रिया करू, असे पोलिसांनी सांगितल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. बृजभूषण हे सातत्याने राज ठाकरेंविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करून कार्यकर्त्यांना भडकावत आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातही वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसेने तक्रार अर्जात केली आहे.
मनसेच्या उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्याबाबत खालच्या भाषेत वक्तव्य केल्यामुळे आणि दोन भाषिकांमध्ये तेढ आणि कायदा सुव्यवस्था बिघडवला जात आहे म्हणून तक्रार केल्याचे सांगितले. शिवाय ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या जनहीत कक्षाच्या वकिलांनी केली आहे. यावेळी दादर पोलीस स्थानकाबाहेर मनसेचे जनहीत कक्षाचे वकील ॲड. गजणे, ॲड. रवी पाष्टे, उपविभाग अध्यक्ष शशांक नागवेकर यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्ये उपस्थित होते.
काय म्हणाले होते बृजभूषण? - राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर यूपीचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी या दौऱ्याला जोरदार विरोध केला होता. जोपर्यंत मुंबईत उत्तर भारतीयांना मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी राज ठाकरे माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना यूपीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा ब्रिजभूषण सिंह यांनी दिला होता. तसेच, राज ठाकरे म्हणजे आपल्या घरातच राहणारा उंदीर आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या टीकेवर राज ठाकरेंनी अद्याप प्रत्युत्तर दिले नाही. राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे. विरोधासाठी महाराष्ट्रातूनच रसद पुरवली गेली, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतरही ब्रिजभूषण हे सातत्याने राज ठाकरेंवर आरोप करत आहे. त्यामुळे, अखेर मनसेतर्फे मुंबई पोलिसांत त्यांची तक्रार करण्यात आली आहे.
हेही वाचा - Maharashtra Weather Forecast : राज्यभरात आज कसे राहील हवामान? कोणत्या शहरात किती तापमान.. घ्या जाणून