मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात ( MNS Gudhipadwa Melava 2022 ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत 'मशिदींवरील भोंगे काढले नाही, तर त्यापेक्षा दुप्पट आवाजात मशिदींसमोर ( Raj Thackeray On Mosque Speaker ) हनुमान चालीसा ( Raj Thackeray Hanuman Chalisa Issue ) लावण्यात येईल, असा इशारा दिला. त्यानंतर आता राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून मनसेत अंतर्गत फुट पडल्याचे पाहायला ( MNS Leaders Angry With Raj Thackeray ) मिळत आहे. राज्यातील अनेक मुस्लीम पदाधिकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. तर पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे ( Vasant More ) यांनीही राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्यानंतर आज त्यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे एकंदरीतच राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर मनसेत अंतर्गत फूट पडल्याचे स्पष्ट आहे.
वसंत मोरे यांची हकालपट्टी - राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर पुण्यातील अनेक पदाधिकारी नाराज आहेत. पुण्यात शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या भागात हनुमान चालिसा लावणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर आज त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यात मनसेच्या इतर 2 पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत. तसेच राज ठाकरे यांनी भोंगा विरोधी भूमिका घेतल्याने नूरानी कब्रस्थान येथील उद्घाटनाच्या शिलालेखावरील राज ठाकरे यांच्या नावाला काळा रंग लावून मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवला होता. या कब्रस्थानच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम राज ठाकरे यांच्या हस्ते झाला होता.
'यापुढे पुन्हा मनसेत जाणार नाही' - मनसेच्या स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रत्येक आंदोलनात सक्रिय असलेले पुणे शहराचे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शहबाज पंजाबी यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भावना दुखावल्या म्हणून राजीनामा दिलेला आहे. ज्या राज ठाकरेंनी सोळा वर्ष मला वाढवलं. त्याच राज ठाकरेमुळे आज मी शून्य झालो, असल्याची भावना पंजाबी यांनी व्यक्त केली होती. यापुढे पुन्हा मनसेत जाणार नाही, अशीही भूमिका त्यांनी घेतली आहे.
शाखा अध्यक्ष माजिद शेख यांचाही राजीनामा - राज ठाकरे यांचा 'मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा' या विधानावरून पुण्यातील अनेक मुस्लीम कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. 'साहेब माणसं जोडायला शिका, माणूस जर एकदा तुटला तर तो परत येत नाही. त्यामुळं माणसं जोडा', अशी आर्त हाक देत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तर पुण्यातीलच मनसेचे शाखा अध्यक्ष माजिद शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राज ठाकरेंविरोधात नाराजी व्यक्त केली.
इरफान शेख यांनीही व्यक्त केली नाराजी - पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनीही सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली. कल्याण डोंबिवली शहरातील मुस्लीम बांधवानी मनसेचे आमदारासह नगरसेवकांना राज ठाकरेंवर विश्वास ठेवून भरभरून मतदान केले. यामुळे २००९ साली कल्याण पश्चिम विधानसभेत मनसेचा आमदार निवडून आला. तर कल्याण ग्रामीणमधून सध्याचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही ७ हजार मुस्लीम मतदारांनी मतदान केल्याने ते निवडून आले. असे असताना मशिदीवरील भोंगे उतरविण्याबाबत राज ठाकरेंनी गुडीपाडव्याला जे भाषणांतून व्यक्तव्य केले त्याबाबत आता मुस्लीम मतदार आम्हाला जाब विचारात असल्याची प्रतिक्रिया मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांन दिली.
एकंदरीतच बघितलं तर मनसेत आजपर्यंत पक्षाध्यक्षांचा आदेश सर्वोतोपरी मानला जात होता. मात्र, कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्षांच्या विरोधात भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.