ETV Bharat / city

MNS Leader Suhas Dasharathe Joined BJP : मनसेचे सुहास दशरथे यांनी केला भाजपात प्रवेश

औरंगाबादचे मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी कार्यकर्त्यांसमवेत आज भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Leader Opposition Devendra Fadnavis ) यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांनी हा प्रवेश केला. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले सुहास दशरथे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे मनसेच्या सभेवर मोठा परिणाम पडणार आहे. सुहास दशरथे हे औरंगाबाद जिल्ह्यातील मनसेचे मोठे नाव होते. त्यांच्या नेतृत्वात मनसेने जिल्ह्यात मोठी लोकप्रियता मिळवली होती. पण, पक्षांतर्गत कारणांमुळे चार महिन्यांपूर्वी त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती.

सुहास दशरथे
सुहास दशरथे
author img

By

Published : Apr 26, 2022, 7:04 PM IST

मुंबई - औरंगाबादचे मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला ( MNS Leader Suhas Dasharathe Joined BJP). विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांनी हा प्रवेश केला. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, आमदार अतुल सावे व अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते. भाजपमध्ये प्रवेश करताना मनसेत असताना नेमकी माझी काय चूक झाली व मला पदावरून का हटवण्यात आले हे मला अद्याप समजले नसल्याचे, सुहास दशरथे यांनी सांगितले.

मनसेसाठी मोठा झटका - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 1 मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या सभेला अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही. तसेच, जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातच आता मनसेला आणखी एक धक्का बसला आहे. औरंगाबाद मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी आज मनसेचे इंजिन सोडून भाजपची वाट धरली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर या शासकीय निवासस्थानी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला.

चार महिन्यापूर्वी मनसेतून झाली होती उचलबांगडी - पोलिसांकडून मनसेला अद्याप औरंगाबाद सभेसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यात जमावबंदी लागू झाल्यामुळे मनसेसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या सर्वात औरंगाबाद जिल्ह्यातील मनसेचे फायरब्रँड नेते, अशी ओळख असलेले सुहास दशरथे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे मनसेच्या सभेवर मोठा परिणाम पडणार आहे. सुहास दशरथे हे औरंगाबाद जिल्ह्यातील मनसेचे मोठे नाव होते. त्यांच्या नेतृत्वात मनसेने जिल्ह्यात मोठी लोकप्रियता मिळवली होती. पण, पक्षांतर्गत कारणांमुळे चार महिन्यांपूर्वी त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या जागी सुमित खांबेकर यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. तेव्हापासूनच दशरथे पक्षावर नाराज होते. तसेच, ते इतर पक्षांच्या संपर्कातही होते. अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा - Raj Thackeray's Meeting : औरंगाबादेत निर्बंध, राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.