मुंबई - महात्मा गांधी यांची आज 151 वी जयंती देशभर साजरी केली जात आहे. त्यानिमित्त मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्व टोलमुक्त महाराष्ट्राचे वचन दिले होते. त्याची आठवण मुख्यमंत्र्यांना मनसेने करून दिली आहे.
-
रघुपती राघव राजाराम .पतित पावन सीताराम. सरकार को सन्मती दे भगवान.सत्याचा धडा देण्याऱ्या महात्मा गांधीजी ना विनम्र अभिवादन pic.twitter.com/9pW67reHCQ
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">रघुपती राघव राजाराम .पतित पावन सीताराम. सरकार को सन्मती दे भगवान.सत्याचा धडा देण्याऱ्या महात्मा गांधीजी ना विनम्र अभिवादन pic.twitter.com/9pW67reHCQ
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 2, 2020रघुपती राघव राजाराम .पतित पावन सीताराम. सरकार को सन्मती दे भगवान.सत्याचा धडा देण्याऱ्या महात्मा गांधीजी ना विनम्र अभिवादन pic.twitter.com/9pW67reHCQ
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 2, 2020
सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधींना अभिवादन, असे ट्विट करत उद्धव ठाकरे यांचा टोलमुक्तीचा वचन देणारा व्हिडिओ देखील संदीप देशपांडे यांनी पोस्ट केला आहे. महात्मा गांधींना अभिवादन करत रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. सरकार को सन्मती दे भगवान. सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन, असे ट्विट केले आहे. मात्र, या संदेशाबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांचा टोलमुक्त महाराष्ट्राचे वचन देत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
सरकार आल्यानंतर महाराष्ट्र टोलमुक्त करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरून मनसेने उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.