मुंबई : पत्राचा गैरव्यवहार प्रकरणातील आरोपाप्रकरणी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader and MP Sanjay Raut ) सध्या ईडी ( ED custody ) कोठडीत आहेत. संजय राऊत ईडीच्या अटकेत असले तरी ते कार्यकारी संपादक असलेल्या सामनात अग्रलेख सातत्याने लिहीत आहेत. आज रविवारचे त्यांचे विशेष रोखठोक सदरदेखील त्यांच्या नावाने प्रसिद्ध ( Samana NewsPaper ) झाले आहे. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला असून, संजय राऊत यांना अटक झालेली असताना त्यांना अग्रलेख लिहिण्याची परवानगी कशी दिली जाते? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व नेते संदीप देशपांडे यांनी ( MNS leader Sandeep Deshpande Criticised ) उपस्थित केला आहे.
तुम्ही काही स्वातंत्र्य सेनानी नाही : यावेळी माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, "खासदार संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. या पत्राचाळ भ्रष्टाचारामुळे जवळपास 650 हून अधिक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. अशा प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला असे लेख लिहिण्याची परवानगी आहे का? कारण जसं लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तुरुंगात बसून अग्रलेख लिहिले ते प्रसिद्ध झाले आणि चळवळी उभ्या राहिल्या. त्याप्रमाणे तुमचं काही नाही. तुम्ही काही स्वातंत्र्यसेनानी नाही. तुम्ही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत आहात. त्यामुळे आमचा प्रश्न आहे अशा आरोपांखाली अटक असणाऱ्या व्यक्तीला अग्रलेख लिहिण्याची परवानगी दिली आहे का?" अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
डुप्लिकेट संजय राऊत तयार झालेत का : सामनाच्या रोखठोक सदरातील लेख हा नेहमी संजय राऊत लिहितात. सध्या संजय राऊत तुरुंगात आहेत. मात्र, दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या सामनातील रोखठोक सदरात संजय राऊत यांच्या नावाने आज देखील विशेष लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या लेखात राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यावर टीका करण्यात आलेय. या संदर्भात बोलताना देशपांडे म्हणाले की, "आमचा मुद्दा मुळात हाच आहे. कारण, संजय राऊत सध्या तुरुंगात आहेत. त्यांना असे लेख लिहिण्याची परवानगी आहे का? आणि जर नसेल तर मग हे लेख कोणी लिहिले? दुसरे कोणी डुप्लिकेट संजय राऊत तयार झालेत का? की तुरुंगात बसून माध्यमांमध्ये कसं झळकत राहता येईल? याचं काही प्लॅनिंग झालंय." असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
मनसेची सामनाच्या रोखठोकवरून टीका : दरम्यान, मनसे विरुद्ध शिवसेना हा वाद काही नवा नाही. संजय राऊत यांना ज्यावेळी अटक झाली त्यावेळी सुद्धा मनसेकडून शिवसेनेला चिमटे काढण्यात आले होते. त्यात आता सामनातील लेखांवरूनदेखील मनसेने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने यावर आता शिवसेनेकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा : Horror Killing In Meerut : मेरठमध्ये हॉरर किलिंग; प्रेमात पडलेल्या मुलीच्या खुनाची वडिलांनीच दिली सुपारी