ETV Bharat / city

ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढवू, मनसेचा निर्धार - मनसेची ग्रामपंचायत निवडणुकीत उडी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने पूर्ण ताकदीने सगळीकडे ग्रामपंचायतीसाठी उमेदवार उभे करणार आहोत. यावेळी या ग्रामपंचायत निवडणुका पूर्णपणे ताकतीने लढवू, असा निर्धार मनसेने केला आहे.

Gram Panchayat elections
संदीप देशपांडे
author img

By

Published : Dec 15, 2020, 10:45 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना गावपातळीवर पोचावी यासाठी मनसेने ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी या ग्रामपंचायत निवडणुका पूर्णपणे ताकतीने लढवू, असा निर्धार मनसेने केला असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.

मनसे नेते संदीप देशपांडे
ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदा घेतलेला नाही. वर्षोनुवर्षे आम्ही ग्रामपंचायत निवडणुका लढवत आहोत. पण यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने पूर्ण ताकदीने सगळीकडे ग्रामपंचायतीसाठी उमेदवार उभे करणार आहोत. गावातील लोकांना शेतीचा, वीज बिलांचा जो त्रास होत आहे, या संदर्भात आवाज उचलण्यासाठी मनसे पूर्ण ताकदीने या निवडणुका लढवणार आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.कशी असेल रणनिती -या निवडणुकीची रणनिती ही त्या-त्या जिल्ह्यानुसार लढवली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचे राजकारण हे वेगळे असते. त्यामुळे प्रत्येक जिल्हा प्रमुखाबरोबर बसून रणनिती आखली जाणार आहे. मनसे हा स्वतंत्रपणे लढणार आहे. स्थानिक भूमिका घेण्याचा अधिकार हा जिल्हा प्रमुखांना देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.