मुंबई - कोरोना व्हायरसची वाढणारी संख्या देशासाठी अन् विशेषत: राज्यासाठी चिंतेचा विषय बनली असताना काही घृणास्पद प्रकार समोर येत आहेत. घरादाराची पर्वा न करता पोलीस आणि डॉक्टर जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत.अशावेळी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. कृष्णकुंजवर आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा... ...अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारा, राज ठाकरेंचा तबलिगींवर हल्लाबोल
कोरोनामुळे ओढवलेल्या संकटाच्या काळात पोलीस, नर्स आणि डॉक्टर जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यावर हात उगारलाच कसा जाऊ शकतो ? असा सवाल करतानाच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांसह कोणत्याही कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.