ETV Bharat / city

Raj Thackeray Ayodhya Tour : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसेकडून 11 रेल्वे गाड्यांची बुकिंग - मनसे कार्यकर्त्यांसाठी 11 रेल्वे गाड्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray Ayodhya Tour ) यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध करत आहेत. असे असले तरी मनसेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विविध शहरातून अयोध्येला कार्यकर्ते जाणार आहेत. यासाठी 11 रेल्वे गाड्यांचे बुकिंग ( Booking of 11 Railway bogie ) करण्यात आले आल्याची माहिती मनसेच्या वतीने देण्यात आली आहे.

Raj Thackeray Ayodhya Tour
Raj Thackeray Ayodhya Tour
author img

By

Published : May 12, 2022, 3:01 PM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जूनला अयोध्या दौरा प्रस्तावित आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत आणि कैसरगंजचे भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा विरोध आहे. आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावे, असे भाजपा खासदार ( BJP MP ) म्हणतात. बाबरी पक्षाचा पक्ष असलेले इक्बाल अन्सारीनेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray Ayodhya Tour ) यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध करत आहेत. असे असले तरी मनसेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विविध शहरातून अयोध्येला कार्यकर्ते जाणार आहेत. यासाठी 11 रेल्वे गाड्यांचे बुकिंग ( Booking of 11 Railway bogie ) करण्यात आले आल्याची माहिती मनसेच्या वतीने देण्यात आली आहे.

योगी आदित्यनाथ यांची घेणार भेट : 5 जून रोजी राज ठाकरेंचा पहिला कार्यक्रम यूपीची राजधानी लखनऊमध्ये आहे. राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची येथे भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान ते रस्त्यावरील लाऊडस्पीकर आणि धार्मिक मेळाव्यांवर बंदी आणल्याबद्दल त्यांचे औपचारिक अभिनंदन करतील. येथून पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक थेट अयोध्येला पोहोचतील. अयोध्येतील रामललाच्या दर्शनासोबतच मनसे प्रमुखांचा हनुमानगढीमध्ये बजरंगबलीची पूजा आणि हनुमान चालीसाचे पठण करण्याचाही कार्यक्रम आहे. मात्र, त्यांच्या दौऱ्याला केसरगंजमधील भाजपा खासदारांकडून विरोध केला जात आहे. त्याचवेळी अयोध्येतील भाजपा खासदार लल्लू सिंह राज यांच्या दौऱ्याचे समर्थन करत आहेत.

हेही वाचा - संभाजीराजे 'स्वराज्य' संघटना स्थापणार; तर राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.