मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाच जुनला अयोध्या दौऱ्यावर जाणार ( Raj Thackeray Ayodhya Tour ) आहेत. मात्र, उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांचा हा दौरा वादात सापडला आहे. अयोध्याचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यातच आता मनसेचा एका कार्यकर्ता ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशी फोनवरुन भिडला आहे. त्याबाबतची ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली ( Tulasi Joshi Called Bjp Mp Brijbhushan Sharan Singh ) आहे.
राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोधा करणाऱ्या ब्रिजभूषण शरण सिंह यांना पालघरमधील मनसेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी फोन केला आहे. फोनवर दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली आहे. फोनवरुन तुलसी जोशी सिंह यांना म्हणतात की, "नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम... मी तुळशी जोशी राज ठाकरे यांचा एक छोटा कार्यकर्ता. तुम्ही प्रभू श्री रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्याचे खासदार आहात. पण, राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केल्यामुळे तुमचे नाव कोणत्या गिनीज बुक किंवा लिमका बुक अथवा कोणत्या ग्रंथात देखील येणार नाही. तुम्ही एक समजूतदार व्यक्ती आहात, याबाबत एकदा योगींचा सल्ला घ्या," असे जोशींनी म्हटले आहे.
त्यावर ब्रिजभूषण शरण सिंह चांगलेच भडकले आहेत. ते म्हणाले की, "माफ करा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. योगींचे सल्ले आम्ही घेत नाही. योगींना मीच सल्ला देतो," असा शब्दांत त्यांनी तुलशी जोशींचा सिंह यांनी सुनावले आहे.
राज ठाकरेंच्या विरोधातील भूमिका कायम - ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी ५ जूनला चलो अयोध्या महाअभियान आयोजित करणार आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी उत्तर भारतीयांचा अपमान सहन केला जाणार नाही. ५ जूनला अयोध्येला जायचे असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी चलो अयोध्या महाअभियानाला पाठिंबा देण्याचे आवाहन केलं आहे. या अभियानाला पाठिंबा देण्यासाठी पोस्टर्स लावून पाठिंबा देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या विरोधातील भूमिका कायम ठेवली आहे.