ETV Bharat / city

Chief Minister Uddhav Thackeray at Hotel Trident :महाविकास आघाडीची बैठक संपली-चारही जागा निवडून आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्यसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,(CM Uddhav Thackeray at Hotel Trident) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar), काॅंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे हाॅटेल ट्रायडेंटमध्ये दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीची महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची (Churas in the election for the sixth seat) होणारच आहे. त्यामुळे एक-एक मताला महत्त्व आले आहे. त्यात आणखी कोरोनाचे संकट त्यामुळे सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीनेसुद्धा त्यांचे उमेदवार रिंगणात उतरवले असल्याने त्यांनी त्यांचे आमदार हाॅटेलमध्ये ठेवले आहेत. आता त्यासंबंधी बैठक हाॅटेल ट्रायडेंटमध्ये होणार आहे. (Hotel Trident)

author img

By

Published : Jun 7, 2022, 7:11 PM IST

Updated : Jun 7, 2022, 11:06 PM IST

Meeting Trident Hotel
आघाडीची बैठक ट्रायडंट हाॅटेल

मुंबई - ट्रायड्रेट हॉटेलमधील महाविकास आघाडीची बैठक संपली आहे. मतदान करताना काळजी घ्या, आपली एकता दाखवा. महाविकास आघाडीच्या चारही जागा निवडून आणा, असे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना बैठकीत आवाहन केले.

हाॅटेल ट्रायडंटमध्ये आघाडीची बैठक

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, की कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चार खासदार राज्यसभेत जाणार आहेत. शेवटची राज्यसभा निवडणूक केव्हा झाली होती, हे आठवतही नाही. एक राजकीय परंपरा पाहायला हवी होती. राजकारण आणि सभ्यता असायला हवी, असा मुख्यमंत्र्यांनी भाजपला टोला लगावला.

ट्रायड्रेट हॉटेलमधील महाविकास आघाडीची बैठक

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होणारच आहे. त्यामुळे एक-एक मताला महत्त्व आले आहे. त्यात आणखी कोरोनाचे संकट त्यामुळे सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीनेसुद्धा त्यांचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, त्याचबरोबर भाजपनेदेखील त्यांचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे त्यांच्यात चुरशीची लढत होणार हे सिद्ध झाले आहे.

Hotel Trident
हाॅटेल ट्रायडंट

बैठकीत ठरणारे महत्त्वाचे मुद्दे : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीची रणनीती या बैठकीत ठरणार आहे. हॉटेल ट्रायडंटमध्ये अपक्ष आमदारांचा समावेश असून, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार यशस्वी ठरला आहे. त्यामुळेच अनेक अपक्षांचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळाला आहे. आपली मते फुटू नयेत तसेच आपल्याला इतर छोट्या-छोट्या पक्षांची मतेसुद्धा मिळायला पाहिजेत याकरिता आता महाविकास आघाडीचे आमदार, मंत्र्यांची विशेष बैठक आता सुरू होत आहे. त्याकरिता विशेष करून राष्ट्रवादी, शिवसेनेचे आमदार हाॅटेल ट्रायडंटमध्ये यायला सुरुवात झाली आहे.

राज्यसभा निवडणुकीतील चुरस वाढण्याची कारणे : शिवसेना आणि भाजपने सहाव्या जागेसाठी आपले उमेदवार दिल्याने आता ही निवडणूक तशी सोपी नाही याची कल्पना दोन्ही पक्षांना आल्याने त्यांनी आपली मते फुटू नयेत याकडे बारीक लक्ष दिले आहे. तसेच त्याबरोबर कोरोनाचे संकट वाढले आहे. भाजप, राष्ट्रवादीचे आमदार, नेत्यांना कोरोना झाल्यामुळे मते देण्याकरिता विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

कोरोना संकट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष करून मुंबईत ही बाब चिंताजनक असून बहुतेक सर्वच पक्षांच्या आमदारांचा मुक्काम आता मुंबईतच असल्याने टेंन्शन अजून वाढले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः कोरोनाबाधित (Devendra Fadnavis is corona positive) झाले आहेत. त्या कारणाने ते कशा पद्धतीने मतदान करणारा हेसुद्धा पहावे लागणार आहे. त्याचबरोबर भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप यांची तब्येत ही बरीच खालावली आहे. ४० दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे तशा पद्धतीची विनंती निवडणूक आयोगाला करणार असल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.

हाॅटेल ट्रायडेंटमध्ये बैठक : राज्यसभेच्या निवडणुकीसंबंधी आता बैठक हाॅटेल ट्रायडेंटमध्ये होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आमदार
मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री दिपक केसरकर, शिवसेना आमदार संजय गायकवाड, मंत्री राजेंद्र शिंगणे, उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, मंत्री राजेश टोपे, मंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेनेचे आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार हॉटेल ट्रायडेंट मध्ये यायला सुरुवात झाली आहे

हेही वाचा : Today Meeting Govt : सायंकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक

Last Updated : Jun 7, 2022, 11:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.