मुंबई - 14 नोव्हेंबर रोजी मुंबई काँग्रेसतर्फे राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचाराविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाई जगताप आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्यात वाद झाला होता. यावरून भाई जगताप यांनी आपला शेकडो कार्यकर्त्यांसमोर अपमान केला, अशी तक्रार झिशान सिद्दिकी यांनी सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
झिशान सिद्दिकींनी काय म्हटले पत्रात -
१४ नोव्हेंबरला मोर्चापूर्वी अनेक नेते राजगृहात गेले होते. जे नेते आत जाणार होते, त्या नेत्यांची यादी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली होती. परंतु मुंबईचे चार कॉंग्रेस आमदार आहेत आणि त्यात मी आमदार व मुंबई युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष असल्याने माझे नाव यादीत नव्हते. माझे नाव यादीत नसतानाही मी निवडून आलेला प्रतिनिधी असल्याने पोलीस अधिकारी यांनी मला आत जाऊ दिले. पण जेव्हा भाई जगतापजींनी हे पाहिले तेव्हा ते धावत बाहेर आले आणि म्हणाले, "इतर कोणीही आत येऊ शकत नाही," त्यावर मी म्हणालो "भाई तुम्ही माझे अध्यक्ष आहात आणि माझे रक्षण करण्याऐवजी तुम्ही माझा अपमान करत आहात हे योग्य नाही. तेव्हा ते म्हणाले "हा जो करना है कर, तेरेको अच्छा नहीं लग रहा है तो **** मे जा" हे ऐकून मला धक्काच बसला. हे पण माझ्याशिवाय इतर पक्षाच्या लोकांनी मला सांगितले की तो सहसा सर्वांशी असाच बोलतो. नेते बाहेर आल्यानंतर मी भाईंना सांगितले की त्यांनी शेकडो लोकांसमोर माझा अनादर करू नये. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप मला धक्काबुक्की करतात आणि माझ्याबद्दल आणि माझ्या समुदायाबद्दल खूप अपमानास्पद बोलतात. माझ्या युवक काँग्रेसच्या सहकार्यांनी मला धक्काबुक्की करताना पाहिल्यानंतर ते भडकले आणि त्यांनी त्याला मागे ढकलले आणि सार्वजनिक ठिकाणी असे घडू नये आणि पक्षाच्या प्रतिमेचे रक्षण व्हावे यासाठी मला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. म्हणून मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे.
'दोघांना समोरासमोर बसून वाद मिटवला जाईल' -
मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येत असताना झिशान सिद्दिकी यांनी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्राबद्दल विचारले असता त्यांनी असा कुठल्याही पद्धतीचा वाद नसल्याचे म्हटले आहे. तसेच मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप व आमदार झिशान सिद्दिकी यांच्यात जो काही वाद आहे. तो दोघांना एकमेकांनसमोर बसवून त्यांच्याशी चर्चा करून तो वाद मिटवला जाईल, असेही नाना पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा - टायर फुटल्याने सोलापूर-अक्कलकोट रोडवर क्रुझर पलटी, २ ठार, ११ जखमी, २ गंभीर