ETV Bharat / city

MLA Yamini Jadhav Appealed to Shivsainik : अतिरेक करू नका, आम्हाला काहीही होणार नाही - आमदार यामिनी जाधव - MLA Yamini Jadhav Appealed to Shivsainik

मुंबई महापालिकेच्या ( BMC ) स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( Chairman of Standing Committee Yashwant Jadhav ) व आमदार यामिनी जाधव ( MLA Yamini Jadhav ) यांच्या घरी दुसऱ्या दिवशीही ( शनिवारी ) आयकर विभागाची छापेमारी ( Income Tax Department Raid ) सुरूच आहे. यामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून जाधव यांच्या घराखाली जमा होत आहेत. शुक्रावारी सकाळी आणि रात्रीही शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. आज पुन्हा जाधव यांच्या घराबाहेर शिवसैनिक जमा झाले आहेत. त्यांना अतिरेक करू नका, सर्वांनी घरी जा. आम्ही जाधव कुटुंबीय सर्व सुखरूप आहोत, तुम्ही आमच्या सोबत आहात आम्हाला काहीही होणार नाही, असे आवाहन आमदार यामिनी जाधव यांनी केले आहे.

जाधव
जाधव दाम्पत्य
author img

By

Published : Feb 26, 2022, 4:46 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या ( BMC ) स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( Chairman of Standing Committee Yashwant Jadhav ) व आमदार यामिनी जाधव ( MLA Yamini Jadhav ) यांच्या घरी दुसऱ्या दिवशीही ( शनिवारी ) आयकर विभागाची छापेमारी ( Income Tax Department Raid ) सुरूच आहे. यामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून जाधव यांच्या घराखाली जमा होत आहेत. शुक्रावारी सकाळी आणि रात्रीही शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. आज पुन्हा जाधव यांच्या घराबाहेर शिवसैनिक जमा झाले आहेत. त्यांना अतिरेक करू नका, सर्वांनी घरी जा. आम्ही जाधव कुटुंबीय सर्व सुखरूप आहोत, तुम्ही आमच्या सोबत आहात आम्हाला काहीही होणार नाही, असे आवाहन आमदार यामिनी जाधव यांनी केले आहे.

शिवसैनिकांना आवाहन करताना आमदार यामिनी जाधव

आयकर विभागाचे अधिकारी अद्याप घरीच - शिवसेना उपनेते आणि पालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी शुक्रवारी सकाळी सहा वाजता आयकर विभागाने छापा टाकला. यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील दोन घरीही आयकर विभागाचे अधिकारी तपास करत आहेत. त्यासोबत यशवंत जाधव यांचे स्वीय सहायक, पालिकेतील कंत्राटदार यांच्यासह मुंबईत विविध 25 ठिकाणी छापा टाकून तपासणी सुरु आहे. माझगाव, काळाचौकी, मालाड, बोरिवली, मुलुंड आदी ठिकाणी या छापा टाकण्यात आला आहे. यशवंत जाधव यांच्या घरी 24 तासांहून अधिक काळ आयकर विभागाची अधिकारी छापेमारी करत आहे. शुक्रवारी गेलेले अधिकारी दुसऱ्या दिवशीही जाधव यांच्या घरात ठाण मांडून आहेत. अद्याप आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीही मिळाले नसल्याने अधिक माहिती गोळा केली जात आहे.

कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा यशवंत जाधव यांच्यावर आरोप - भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लॉन्डरिंग ( Money Laundering ) आणि शंभर कोटींचा घोटाळा ( Hundred Crore Scam ) केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी केंद्रीय यंत्रणांकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने ही छापेमारी सुरू असल्याचे समजते. दरम्यान, यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. तर यामिनी जाधव यांनी निवडणुकीत चुकीची माहिती दिल्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाल्यावर त्यांनी हे प्रकरण आयकर विभागाकडे दिले. त्यानुसार आयकर विभाग कारवाई करत असल्याची माहिती महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे ( BJP Group Leader Prabhakar Shinde ) यांनी दिली.

शिवसैनिक संतप्त - यशवंत जाधव यांच्या घरावर शुक्रवारी आयकर विभागाचा छापा पडल्यावर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली. ते जाधव यांच्या घराजवळ एकत्र आले आणि घोषणाबाजी केली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) यांनी शिवसैनिकांना शांत केले. कायदा हातात घेऊ नका, यशवंत जाधव याचे उत्तर देतील, असे आवाहन महापौरांनी केले. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास यशवंत जाधव यांना घरातून बाहेर काढण्याचा समजल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने यशवंत जाधव यांच्या घरा बाहेर एकत्र आले. शिवसैनिकांनी आयकर विभागाचे छापेमारीच्या विरोधात घोषणाबाजी केली. स्थानिक पोलिसांनी त्यांची समजूत काढून शांत केले. त्यानंतर रात्रभर शिवसैनिक यशवंत जाधव यांच्या घराबाहेर बसून राहिले होते.

हेही वाचा - IT Raid On Yashwant Jadhav : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरूच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.