मुंबई - शिवसेनेला खिंडार पाडणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शहाजी बापू यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आपल्या नावागामील ठाकरे नाव काढले तर ते ५० लोकांची सभाही घेवू शकणार नाहीत, अशी टीका पालील यांनी केली आहे. त्यावर ज्या पक्षात तुम्ही जाणार आहात त्यातही ठाकरे हे नाव आहे, ते नाव काढून घेणार का असा प्रश्न मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी शहाजी पाटलांना विचारला आहे.
काय केली शहाजी पाटील यांनी टीका - शिवसेनेत फूट पडल्यावर महाविकास आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवसेनेत फूट पाडणारे एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्री केले. याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. याच दरम्यान आदित्य ठाकरे राज्यभर शिव संवाद यात्रा काढत आहेत. त्यात बंडखोराविरोधात ते जोरदार टीका करत आहेत. यावर शहाजी पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कॉपी करून नेतृत्व टिकत नाही. ठाकरी भाषा फक्त शिवसेनाप्रमुखांना शोभते. कोणी पोराने ती वापरू नये अशी टीका त्यांनी केली आहे.
तिकडेही ठाकरे हे नाव आहे ते नाव काढून घेणार का? - आदित्य यांच्या नावामागील ठाकरे हे नाव काढले तर ५० माणसांची सभा देखील ते देवू शकणार नाहीत, अशी टीका शहाजी पाटील यांनी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शहाजी पाटील यांनी केलेल्या टीकेवर बोलताना, काय झाडी काय डोंगार या एका वाक्याने इतकी प्रसिद्धी दिली म्हणून ठाकरे नाव काढून घ्या सांगण्याची इतकी हिम्मत करू नका. तुमचा बाप आणि आडनाव आहे ना, ज्या पक्षात तुम्ही जाणार आहात त्यातही ठाकरे हे नाव आहे ते नाव काढून घेणार आहात का? असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - Cabinet Expansion:...अरे बाबा दोघांच का असेना, चाललयना?; मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया