ETV Bharat / city

आमदार संतोष बांगर शिंदे गटात; शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंसोबत म्हणत झाले होते अश्रू अनावर - MLA Santosh Bangar news

शिवसेनेतून एक आमदार बाहेर निघाल्याचे समजले आहे. आमदार संतोष बांगर ( MLA Santosh Bangar joined Eknath Shindes group ) हे शिंदे गटात सामील झाले आहेत. काल त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, आज ते शिंदे ( MLA Santosh Bangar news ) गटात आल्याने या गटाला बळ मिळणार आहे. हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका मानला जात आहे.

MLA Santosh Bangar joined Eknath Shindes group
आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील
author img

By

Published : Jul 4, 2022, 11:10 AM IST

Updated : Jul 4, 2022, 5:41 PM IST

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी ( MLA Santosh Bangar joined Eknath Shindes group ) करून आपला वेगळा गट स्थापन केला. यानंतर शिवसेनेत आमदारांची गळतीच सुरू झाली. आता शिंदे गटाने भाजपबरोबर राज्यात सरकार स्थापन केली आहे. आज विधानभवनात विश्वास दर्शक ठराव असून यात शिंदे भाजप गटाला बहुमत सिद्ध करायचे आहे. अशातच आता शिवसेनेतून एक आमदार बाहेर निघाल्याचे समजले आहे.

  • आज मतदारसंघांमध्ये परत आल्यानंतर उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना अश्रू अनावर झाले....शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख #उद्धव_ठाकरे साहेबा सोबत. @ShivSena @AUThackeray pic.twitter.com/loMHpUI4cL

    — आमदार संतोष बांगर (@santoshbangar_) June 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Eknath Shinde Gov Floor Test : दरवाजे बंद झाल्याने अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवारांसह मतदानाला सहा जण मुकले

आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात ( MLA Santosh Bangar news ) सामील झाले आहेत. काल त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, आज ते शिंदे गटात आल्याने या गटाला बळ मिळणार आहे. हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका मानला जात आहे.

16 आमदार असलेल्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, कारण सोमवारी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावासाठी गोगावले यांनी जारी केलेला व्हीप त्यांना बंधनकारक असणार आहे. या 16 आमदारांनी व्हिप पाळण्यास नकार दिल्यास त्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागू शकते. या १६ आमदारांवर कारवाई करण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना असणार आहे. या निर्णयाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून न्यायालयामध्ये दाद मागितली जाणार आहे. विशेष म्हणजे, आज होणाऱ्या बहुमत चाचणी दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे १६ आमदार काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - COVID19: भारतात गेल्या 24 तासात 16,135 नवीन कोरोना रुग्ण, 24 जणांचा मृत्यू

Last Updated : Jul 4, 2022, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.