मुंबई - शिवसेना आमदार रविंद्र वायकर ( MLA Ravindra Waikar on ED ) यांची ईडीने ( Enforcement Directorate ) तब्बल आठ तास चौकशी केली. आमदार वायकर ( MLA Ravindra Waikar ) यांनी आज विधानभवनात हजेरी लावताच, प्रसारमाध्यमांनी प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान, ईडीने चौकशीला बोलवले होते मी गेलो आणि त्यांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांना उत्तरे दिल्याचे आमदार वायकर यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी रवींद्र वायकर विधानभवनात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ईडी चौकशीवरही त्यांनी देताना ते म्हणाले, आरोप वगैरे काही नाहीत. ईडीला काही प्रश्न विचारायचे होते. चौकशीचा त्यांना संपूर्ण अधिकार असून त्यानुसार त्यांनी मला बोलावले होते. बोलवल्यानंतर जाणे आणि स्पष्टीकरण देणे महत्वाचे होते. त्यानुसार त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली असून देशाचा नागरिक म्हणून माझे कर्तव्य केल्याचे वायकर म्हणाले.
वायकर यांची ईडीकडून आठ तास चौकशी
शिवसेना आमदार रविंद्र वायकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांचे विश्वासू मानले जातात. वायकर यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यानुसार वायकर हे ईडी कार्यालयात हजर झाले होते. तब्बल 8 तास वायकर यांची चौकशी करण्यात आली. मात्र, नेमके कोणत्या प्रकरणी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते, हे याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.