ETV Bharat / city

Rana VS Shivsena : मातोश्रीवर उद्या 9 वाजता हनुमान चालीसाचे पठण करणारच; रवी राणांचा निर्धार - रवी राणा मातोश्री हनुमान चालीसा

कोणत्याही परिस्थितीमध्ये शांततेत पोलिसांच्या सहकार्याने मातोश्रीवर जाणार आहे. कितीही विरोध झाला तरी हनुमान चालीसाच पठण केले ( Recite Hanuman Chalisa In Front Matoshri ) जाईल, असा निर्धारच रवी राणा ( Mla Ravi Rana ) यांनी केला आहे.

Mla Ravi Rana
Mla Ravi Rana
author img

By

Published : Apr 22, 2022, 5:10 PM IST

मुंबई - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( Mla Ravi Rana ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे ( Recite Hanuman Chalisa In Front Matoshri ) आव्हान दिले होते. त्यानुसार ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर आता रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. तेव्हा बोलताना कितीही विरोध झाला तरी आम्ही उद्या सकाळी ९ वाजता मातोश्री येथे जात हनुमान चालीसाचे पठण करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये शांततेत पोलिसांच्या सहकार्याने मातोश्रीवर जाणार आहे. कितीही विरोध झाला तरी हनुमान चालीसाच पठण केले जाईल, असा निर्धारच रवी राणा यांनी केला आहे.

आम्ही मुंबईत पोहोचलो तरी शिवसैनिकांना थांगपत्ता नाही? - रवी राणा म्हणाले की, हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान मी हनुमान जयंतीच्या दिवशी दिले होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या ( 23 एप्रिल ) सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार आहोत. जर, हनुमान जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरेंनी हनुमान चालीसाचे पठण केले असते. तर, आता जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे, जी शिवसैनिकांची भूमिका रस्त्यावर उतरलेली आहे, ते चित्र दिसले नसते. विशेष म्हणजे मुंबईत आल्यावर मला पाय ठेवू देणार नाही, असे सांगणारे शिवसैनिक चक्क मी माझ्या पत्नीसह मुंबई पोहचलो. तरी, सुद्धा त्यांना थांगपत्ता लागला नाही, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

रवी राणा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विसर पडलेला आहे. ते जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून राज्याची परिस्थिती डबघाईला गेलेली आहे. त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही. राज्य अधोगतीकडे जात असताना मुख्यमंत्री मात्र घरातून बाहेर पडत नाहीत. मी अपक्ष आमदार आहे मला कोणाचाही पाठिंबा नाही. भाजपच्या पाठिंब्याची मला आवश्यकता नाही. हनुमान चालीसाचे पठण मी स्वतःहून करत आहे. त्यामुळे माझ्यावर भाजप पुरस्कृत असल्याची टीका होत आहे. परंतू, या टीकेला काहीच अर्थ नाही. वास्तविक भाजप होती म्हणून शिवसेना सत्तेत आली, असा टोलाही रवी राणांनी शिवसेनेला लगावला आहे.

परिस्थिती सुधारण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण करायचे - हनुमान चालीसा न वाचल्यामुळे ठाकरे सरकारची, अशी परिस्थिती झाली आहे. शिवसैनिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. जर, हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांनी हनुमान चालीसा वाचली असती, तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हिंदूंचा अपमान झाला नसता. त्यांना पूर्णपणे बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडलेला आहे. महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम करू शकत नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे, बेरोजगारी वाढली आहे, औद्योगिक विकास पूर्णपणे थांबलेला आहे. त्यामुळे त्यांच्या वेदना संपवण्यासाठी त्यांना हनुमान चालीसा पठण करणे गरजेचे असल्याचेही रवी राणांनी म्हटले आहे.

पोलिसांना चकवा देत मुंबईत - नवनीत राणा आणि रवी राणा शुक्रवारी रात्री आठ वाजता बडनेरा इथून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला रवाना होणार होते. याबाबत त्यांनी दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. राणा दाम्पत्य शुक्रवारी मुंबईला जाणार असल्याची माहिती होती. त्यामुळे यंत्रणा शुक्रवारी सकाळपासूनच अलर्ट असताना पोलिसांना गाफील ठेवून राणा दाम्पत्य शुक्रवारी पहाटे मुंबईसाठी नागपूर विमानतळावरुन रवाना झाले. त्यानंतर मुंबईत आल्यावर राणा यांनी खार येथील निवासस्थान गाठले.

मुंबई पोलिसांची राणा दाम्पत्याला नोटीस - मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे आव्हान देणार राणा दाम्पत्या मुंबईतील खार निवासस्थानी दाखल झाले. याची माहिती मिळताच सडेतोड उत्तर देण्यासाठी आज मुंबईत विविध ठिकाणी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये या कारणासाठी खेरवाडी पोलिसांकडून आमदार रवी राणा यांना 149 ची नोटीस ( Khervadi Police Notice To Rana Couple ) देण्यात आली आहे.

संजय राऊतांची टीका - कोणाला स्टंट करायचे असतील तर करू द्या, मुंबईचे पाणी त्यांना माहीत नाही. मुंबईचे लोक सक्षम आहे. हनुमान चालीसा वाचणे रामनवमी साजरी करणे हा श्रद्धेचा विषय आहे. नौटंकी आणि स्टंटचा विषय नाही अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर केली आहे.

हेही वाचा - Navneet Rana vs Shivsena : शिवसैनिकांना हुलकावणी देत राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; मातोश्रीवरील सुरक्षेत वाढ

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.