ETV Bharat / city

Prasad Lad In High Court : पोलीस कारवाईपासून संरक्षण मिळावे; प्रसाद लाड यांची उच्च न्यायालयात धाव

मुंबई उच्च न्यायालयात प्रसाद लाड यांनी याचिका दाखल केली ( Prasad Lad In High Court ) आहे. कथित जुन्या प्रकरणात पोलीस कारवाईच्या भितीने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Prasad Lad
Prasad Lad
author img

By

Published : Mar 7, 2022, 3:22 PM IST

मुंबई - भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली ( Prasad Lad In High Court ) आहे. कथित फसवणुकीच्या जुन्या प्रकरणात कारवाईच्या भीतीने त्यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेत पोलीस कारवाई पासून संरक्षण मिळावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

प्रसाद लाड यांनी म्हटलं की, एका कंत्राटात फसवणूक झाल्याच्या कारणावरुन पाच वर्षांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती. ते प्रकरण आता संपले सुद्धा. मात्र, तरीही आता पुन्हा ते काढून माझ्याविरोधात कारवाई करण्याचा घाट घातला जात असल्याची भितीही लाड यांनी व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई महापालिकेत 2009 साली प्रसाद लाड यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लाड यांच्यावर 2014 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने लाड यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आता कारवाईच्या भितीने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

हेही वाचा - Malik in judicial custody: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना न्यायालयीन कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.