ETV Bharat / city

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल - गृहमंत्र्यांविरोधात समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

खंडणी मागितल्याप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करा, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी समतानगर पोलीस ठाण्याच तक्रार दाखल करत केली आहे.

complaint against Home Minister Anil Deshmukh

author img

By

Published : Mar 22, 2021, 3:21 PM IST

Updated : Mar 22, 2021, 4:27 PM IST

मुंबई - खंडणी मागितल्याप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करा, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. भातखळकर यांच्याकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गृहमंत्र्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करा -

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईतून दर महिन्याला 100 कोटी रुपये खंडणी जमा करून देण्याचे आदेश दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून अशाप्रकारे राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करणे हे अतिशय गंभीर प्रकरण असून, या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देशमुख यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करावा व परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात नमूद केलेल्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुंबई भाजप प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. समता नगर पोलीस ठाण्यात भातखळकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर

हे ही वाचा - 'लेटर बॉम्ब' प्रकरणावर महाराष्ट्र काँग्रेस दिल्लीच्या हाय कमांडला पाठवणार अहवाल

उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पुराव्यांसह इतके गंभीर आरोप करून दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलठून गेला असताना सुद्धा राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची चौकशी सुरू करण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर परमवीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्राच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आलेल्या खुलासा पत्रात सुद्धा परमबीर सिंग यांच्या कोणत्याही आरोपांचे खंडन करण्यात आलेले नाही. त्यामुळे परमबीर सिंग यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपामध्ये तथ्य असण्याची दाट शक्यता आहे. तसेच, या प्रकरणात नावे असलेल्या अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे, पोलीस उपायुक्त भुजबळ, सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांची चौकशी केल्यास आणखी सत्य समोर येतील. तसेच यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणी अनिल देशमुखांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे, जर या संदर्भात राज्य सरकारकडून 24 तासांत गुन्हा दाखल न झाल्यास आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सुद्धा आ. अतुल भातखळकर दिला आहे.

हे ही वाचा - "निलंबनाची मागणी करणाऱ्यांचेच परमबीर हे आज 'डार्लिंग' झालेत"
तसेच या पत्रात समता नगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या बार, रेस्टॉरंट, पब यांच्याकडून किती खंडणी आतापर्यंत वसूल करण्यात आली आहे व ती कोणी वसुली केली, याची सुद्धा सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Last Updated : Mar 22, 2021, 4:27 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.