मुंबई - भाजपा नेते आमदार आशिष यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला ( Ashish Shelar Criticized Sanjay Raut ) आहे. संजय राऊत यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. त्यामुळे राऊत यांची कोल्हेकुई सुरु असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात ते बोलत होते.
प्रसारमाध्यमांना बोलताना आशिष शेलार म्हणाले की, "केंद्रीय तपास यंत्रणा कायद्याप्रमाणे वागत आहेत. परंतु, राज्यातील पोलीस यंत्रणा पक्षपातीपणा करत ( Ashish Shelar On Maharashtra Police ) आहे. आमदार नितेश राणे, आमदार रवी राणा यांच्यावरील गुन्हा पक्षपातीपणा नाही का? असा प्रश्नही या वेळी शेलार यांनी उपस्थित केला. संजय राऊत ( Mp Sanjay Raut ) यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत म्हणूनच त्यांची कोल्हेकुई सुरू आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील एकही नेता संजय राऊत यांच्या बरोबर नाही. मागील ७ वर्ष संजय राऊत यांच्या मागे ईडी का लागली नाही? हे त्यांनी पहावं. संजय राऊत आता एकाकी पडले असून अशा पद्धतीने ते वक्तव्य करत आहेत," असेही शेलार यांनी म्हटलं.
मागे निवडणुका घेतल्या आता का नको?
महाविकास आघाडीला माझा सवाल आहे की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुद्धा तुम्ही निवडणुका घेतल्या. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक सुद्धा तुम्ही लावली, त्याचबरोबर दोन पोटनिवडणूक तुम्ही घेतल्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार झाला. मग, मुंबई, ठाणे, पुणे येथील महापालिकेच्या निवडणुका का होऊ शकत नाहीत? मुंबई महापालिकेवर प्रशासक बनवण्यामध्ये काही छुपाडाव तर नाही ना?, अशी शंकाही आशिष शेलार यांनी व्यक्त ( Ashish Shelar On Corporation Election ) केली.
हेही वाचा - Goa Assembly Election 2022 : गोव्यात उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीचे बंड, लढणार अपक्ष निवडणूक