ETV Bharat / city

Miss Universe 2021 In Mumbai : 'मिस युनिव्हर्स' हरनाझ संधू मायदेशी परतली, मुंबईत जोरदार स्वागत - Miss Universe 2021

'मिस युनिव्हर्स' हरनाझ संधू मायदेशी परतली. मुंबई विमानतळावर हरनाझचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी हरनाझने हात उंचावत चाहत्यांचे अभिवादन केले. काही दिवसांपूर्वीच तिची मिस युनिव्हर्स २०२१ अशी निवड करण्यात आली आहे.

Harnaaz Kaur Sandhu
हरनाझ संधू
author img

By

Published : Dec 16, 2021, 6:47 AM IST

Updated : Dec 16, 2021, 3:27 PM IST

मुंबई - पंजाबची सौंदर्यवती हरनाझ संधू (Harnaaz Sandhu crowned Miss Universe 2021) 'मिस युनिव्हर्स'चा ताज घेऊन मायदेशी परतली. भारतात येताना प्रथम ती मुंबईला आली. मुंबईमध्ये (Harnaaz Sandhu was welcomed with applause in Mumbai) हरनाझचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी हरनाझने हात उंचावत अभिवादन केले. तिला बघण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या दरम्यान, एका चाहत्याच्या हातातील तिरंगा घेऊन तिने फोटोग्राफर्सला पोज दिली.

इस्रायलमधील इयालत (Eilat ) येथे मिस युनिव्हर्स 2021 ची (Miss Universe 2021 Winner) घोषणा झाली होती. जगभरातील सौदर्यंवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तब्बल 21 वर्षांनंतर भारताने ‘मिस युनिव्हर्स 2021’ किताब जिंकला आहे. यापूर्वी 2000 मध्ये लारा दत्तानेमध्ये ‘मिस युनिव्हर्स 2021’ पटकावले होते.

यापूर्वी सर्वप्रथम 1994 मध्ये सुष्मिता सेनने भारताला हा बहुमान मिळवून दिला. त्यानंतर लारा दत्ताने 2000 साली हा किताब जिंकला होता. आता तब्बल 21 वर्षांनी हरनाझ संधूने मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला आहे. इस्रायलच्या इलियट येथील एका रिसॉर्टमध्ये आयोजित स्पर्धेत मॅक्सिकोची माजी मिस यूनिव्हर्स एंड्रिया मेजाने हरनाझ संधुच्या डोक्यावर ताज चढवला. 21 वर्षीय हरनाज मूळ पंजाबची रहिवाशी आहे.

Last Updated : Dec 16, 2021, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.