ETV Bharat / city

निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, विजय वडेट्टीवार यांचे आदेश

पालघर, पुणे आणि रायगडसह राज्यातील १४ ते १५ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाईचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

Mumbai
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Jun 5, 2020, 12:53 AM IST

मुंबई - निसर्ग चक्रीवादळाने पालघर, पुणे आणि रायगडसह राज्यातील १४ ते १५ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन व मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार शनिवारपासून राज्यातील प्रभावग्रस्त नऊ जिल्ह्यांना भेटी देऊन जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष बैठकाही करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नुकसान झालेल्या जिल्ह्यांना तातडीने मदत देण्याची आमची भूमिका असून त्यासाठीच जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. ज्यात ७८ हजार १९१ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तर २१ एनडीआरएफ व ६ एसडीआरएफ पथके तैनात करण्यात आली होती. निसर्ग चक्रीवादळाने राज्यात ६ व्यक्तींचा मृत्यू झाला असून ६ जनावरे दगावली तर १६ नागरिक जखमी झाले. रायगड जिल्ह्यात प्राथमिक माहितीनुसार ५०३३ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले.

मृत व्यक्तींच्या वारसांना ४ लाख रुपये याप्रमाणे सानुग्रह अनुदान लगेच द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत सांगितले होते. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात सादर करावेत म्हणजे शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून महावितरणने तातडीने वीज पुरवठा सुरु करावा व प्रसंगी त्यासाठी इतर ठिकाणाहून जास्तीचे मनुष्यबळ, साधन सामुग्री उपलब्ध करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.