ETV Bharat / city

'आयटीआयमधील प्रवेश-साहित्य खरेदीच्या भ्रष्टाचाराची होणार एसीबीकडून चौकशी'

शिक्षक आमदार नागो गाणार यांनी आयटीआयमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबतची लक्षवेधी सभागृहात मांडली. सरकार या संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. त्यावर कौशल्य विकास मंत्री संभाजी-पाटील निलंगेकर यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची घोषणा केली.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 2, 2019, 8:06 PM IST

मुंबई - औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) १०० कोटींहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री संभाजी-पाटील निलंगेकर यांनी आज लक्षवेधीच्या उत्तरात दिली.

शिक्षक आमदार नागो गाणार यांनी याविषयी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. संबंधित अधिकाऱ्यांना सरकार पाठिशी घालत असून या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी गाणार यांनी लावून धरली होती. यावर निलंगेकर यांनी यासाठी एक चौकशी समिती नेमण्यात आली होती.

राज्यातील आयटीआयमध्ये २०१३ आणि २०१४-१५ या कालावधीत झालेल्या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर २०१७ आणि १८ मध्ये पुन्हा ५० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. यात संबंधित अधिकाऱ्यांनी १० कोटींचा मलिदा खाल्ला. याप्रकरणी संबंधित कौशल्य आणि विकास खात्याचे अधिकारी असीम गुप्ता, तत्कालीन प्रभारी संचालक विजयकुमार गौतम, खासगी सचिव मारुती मोरे, प्रभारी संचालक अनिल जाधव, उपसंचालक योगेश पाटील यांना तत्काळ निलंबित करण्याची आणि या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली.

यावर कौशल्य विकास मंत्री संभाजी-पाटील निलंगेकर यांनी या संपुर्ण प्रकरणाची चौकशी एसीबीकडे सोपवण्यात येत असून येत्या १५ ऑगस्टपर्यंत याप्रकरणाचा अहवाल मागवण्यात येईल तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. राज्यात मोठ्या प्रमाणात आयटीआयमध्ये शिकवण्यात येणाऱ्या ट्रेडसाठी विविध प्रकारचे साहित्य खरेदी केले जाते. त्यात ५० कोटींचे साहित्य हे गरज नसताना खरेदी करून त्यातही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मलिदा खाल्ला असून त्या प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी आमदार गाणार यांनी केली होती. त्यावरही अशा प्रकारे आयटीआय संस्थांमध्ये ५० कोटींचे साहित्य खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असेही निलंगेकर पाटील यांनी स्पष्ट केले.

Intro:आयटीआयमधील प्रवेश-साहित्य खरेदीच्या भ्रष्टाचाराची एसीबीकडून चौकशी- संभाजी पाटील-निलंगेकर

मुंबई,ता. २ :
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)मध्ये झालेल्या १०० कोटींहून अधिकच्या भ्रष्टाचार प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधककडून चौकशी करण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री संभाजी-पाटील निलंगेकर यांनी आज लक्षवेधीच्या उत्तरात दिली. शिक्षक आमदार नागो गाणार यांनी याविषयी लक्षवेधी सूचना उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांना सरकार पाठिशी घालत असून या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी गाणार यांनी लावून धरली होती. यावर निलंगेकर यांनी सांगितले की, यासाठी एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. मात्र,आता या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्यात येत असून येत्या १५ ऑगस्टपर्यंत एसीबीकडून मागवण्यात येईल आणि दोषी आढळणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले .
राज्यातील आयटीआयमध्ये २०१३ आणि २०१४-१५ या कालावधीत झालेल्या प्रवेश प्रक्रीयेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर २०१७ आणि १८ मध्ये पन्हा ५० कोटींचा भ्रष्टाचार झाला. यात संबंधित अधिका-यांनी १० कोटींचा मलिदा खाल्ला. याप्रकरणी संबंधित कौशल्य आणि विकास खात्याचे अधिकारी असीम गुप्ता, तत्कालीन प्रभारी संचालक विजयकुमार गौतम, खाजगी सचिव मारुती मोरे, प्रभारी संचालक अनिल जाधव, उपसंचालक योगेश पाटील यांना तत्काळ निलंबित करण्याची आणि या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. यावर कौशल्य विकास मंत्री संभाजी-पाटील निलंगेकर यांनी या संपुर्ण प्रकरणाची चौकशी एसीबीकडे सोपवण्यात येत असून येत्या १५ ऑगस्टपर्यंत याप्रकरणाचा अहवाल मागवण्यात येईल तसेच दोषी अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. राज्यात मोठ्या प्रमाणात आयटीआयमध्ये शिकवण्यात येणाऱ्या ट्रेडसाठी विविध प्रकारचे साहित्य खरेदी केले जाते, त्यात ५० कोटींचे साहित्य हे गरज नसताना खरेदी करून त्यातही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मलिदा खाला असून त्या प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी आमदार गाणार यांनी केली होती. त्यावरही अशा प्रकारे आयटीआय संस्थांमध्ये ५० कोटींचे साहित्य खरेदी करणा-या अधिका-यावरही कारवाई करण्यात येईल असेही निलंगेकर पाटील यांनी स्पष्ट केले.
Body:आयटीआयमधील प्रवेश-साहित्य खरेदीच्या भ्रष्टाचाराची एसीबीकडून चौकशी- संभाजी पाटील-निलंगेकरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.