मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Babasaheb Ambedkar Birth Anniversary ) यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी होणाऱ्या मिरवणुकांना महाराष्ट्र सरकारने परवानगी नाकारू नये, असे निवेदन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. राज्यात काही ठिकाणी 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकींना परवानगी नाकारल्याच्या दावा त्यांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमिवर त्यांनी हे पत्र जारी केले आहे.
राज्याच्या काही भागात मिरवणुकीसाठी परवानगी नाकारल्या जात असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याकडे लक्ष द्यावे. राज्य सरकारने संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त मिरवणुकीला परवानगी नाकारू नये, असे आठवले यांनी या निवेदनात नमूद केले आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे कोणतेही सार्वजनिक उत्सव झाले नाहीत. परंतु, यावर्षी गुढीपाडवा आणि शिवजयंतीसाठी मिरवणुकांना परवानगी देण्यात आली होती, असेही आठवले यांनी यामध्ये नमूद केले आहे.
हेही वाचा - CM Uddhav Thackeray : कोरोनानंतर मुख्यमंत्री अखेर मंत्रालयात; कर्मचाऱ्यांना दिल्या 'या' सूचना