ETV Bharat / city

मुंबई पालिका अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंची छाप, पर्यटन वाढीसाठी सौंदर्यीकरणावर भर

मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात पर्यटनासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आल्या असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची छाप असणार आहे.

author img

By

Published : Feb 3, 2021, 1:20 AM IST

पर्यटन वाढीसाठी सौंदर्यीकरणावर भर
पर्यटन वाढीसाठी सौंदर्यीकरणावर भर

मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव, लॉकडाऊनमुळे मुंबईतील अनेक प्रकल्प रखडले आहेत. मुंबई कोरोनामधून सावरत असताना महापालिकेचा अर्थसंकल्प आज (३ फेब्रुवारी रोजी) स्थायी समितीला सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात मिठी नदी पर्यटनक्षेत्र, युनिडायरेक्टरल ट्रॅफिक लाईट, समुद्र व्हिविंग गॅलरी, गेट- वे ला ग्रीन झोन, मुंबईला पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी सौंदर्यीकरण आदींवर भरीव तरतूदी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या अर्थसंकल्पावर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची छाप असणार आहे.

इलेक्शन बजेट -

कोरोनाच्या काळात तब्बल वर्षभर विविध विकास प्रकल्प ठप्प झाले होते. त्यांना गती देणारा यंदाचा अर्थसंकल्प असणार आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाचे आकारमान ३३,४४१ कोटी रुपये होते. त्या अर्थसंकल्पात ८.९५ टक्क्यांची वाढ झाली होती. यंदा ही वाढ ८ ते १० टक्के इतकी असेल अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कोणताही नवीन कर लावण्यात येणार नाही. मात्र अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही महिन्यांनी मालमत्ता कर वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर हे इलेक्शन बजेट असेल.

शिक्षण, आरोग्यासाठी तरतूद -

२०२० -२१ च्या अर्थसंकल्पात आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये कोरोनाच्या महामारीनंतर बदल करण्यासाठी विशेष तरतुदी केल्या जातील. शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये भरीव तरतूद असणार आहे. कोस्टल रोडचे कामही २०२३ पर्यंत पूर्णत्वास नेण्यात येणार असल्यामुळे यासाठी मोठी तरतूद केली जाईल. कोस्टल रोड आणि पालिका शाळांमध्ये सीबीएसई- आयसीएसई बोर्डाच्या माध्यमातून अद्ययावत शिक्षणावर भर दिला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबरमध्ये मंजूर केलेल्या मुंबईतील मनोरी येथील डिसील्टिंग प्लांटसाठी अर्थसंकल्पासाठी विशेष तरतूद असेल.

पर्यावरण संवर्धनाकडे कल -
सन २०२१- २२ च्या अर्थसंकल्पात देशाची आर्थिक राजधानी असलेले हे शहर वाहतुकीच्या दृष्टीनेही सर्वोत्तम व्हावे, वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी सोयीचे व्हावे, मुंबईतील सिग्नलच्या दिव्यांमध्ये पुरुष आणि महिलांच्या चिन्हाकृती असणारे युनिडायरेक्टरल ट्रॅफिक लाईट बसविण्यावर भर दिला जाईल. मिठी नदीचे सौंदर्यीकरण-बोटिंग, नद्यांचे पुनरुज्जीवन, समुद्र किनारी व्हीविंग गॅलरी, सुरक्षित मुंबईसाठी पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता दुप्पट करणे, मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवणे, फ्लड गेट वाढवणे यासह दर्जेदार सिमेंटचे रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाणार आहे. पर्यावरण संवर्धनाकडे पालिकेचा कल असेल. एकूणच आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी विविध योजनांवर विशेष तरतुदींचा या अर्थसंकल्पात समावेश असणार आहे.

काटकसरीवर भर -
आर्थिक वर्ष कोविडमध्ये गेल्याने अपेक्षित उत्पन्नाच्या केवळ ३० टक्के महसूल आतापर्यंत जमा झाला आहे. त्यामुळे पालिकेचे आर्थिक गणित बिघडल्याने शेअर मार्केटमध्ये रोखे विकून पालिका निधी उभारण्याचा विचार करत आहे. शिवाय, महसूली खर्च देखील कमी करण्याचा विचार महापालिका करीत आहे. यावेळी महसूल खर्चाच्या बाबतीत पेन्शन आणि पगाराला स्पर्श केला जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशा असतील महत्त्वाकांक्षी योजना -

  • कोविडच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात साथजन्य आजारांसाठी विशेष रुग्णालये.
  • पालिकेचे दवाखाने संध्याकाळच्या वेळेतही सुरूच राहणार
  • अतिवृष्टीत पावसाचे पाणी साचवण्यासाठी भूमिगत टाक्या
  • नद्यांचे सौंदर्यीकरण, मिठी नदीमध्ये बोटिंग
  • समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी तरतूद
  • सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या नव्या शाळा सुरू करणे
  • स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी कचर्‍याची विल्हेवाट प्रकल्प, कचर्‍यापासून वीज प्रकल्प
  • पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना, पर्यावण संवर्धन उपक्रम
  • उत्पन्न वाढीसाठी कर्जरोखे तयार करणे
  • पुलांच्या मजबुतीसाठी, नवीन पुलांसाठी विशेष निधी, सीसीटीव्ही कॅमेरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.