ETV Bharat / city

Lakhimpur Case : केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा घ्या - नवाब मलिक - केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा

केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठी उभा आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा या प्रकरणात हात असताना त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने त्यानंतर मिश्र यांच्या मुलाला अटक झाली. गृह राज्यमंत्र्यांच्या गावात ही घटना घडली. त्यांनी शेतकऱ्यांना धमकावले. त्यामुळे मिश्रा यांनी राजीनामा दिला पाहिजे. केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असे मलिक यांनी सांगितले.

नवाब मलिक
नवाब मलिक
author img

By

Published : Oct 10, 2021, 3:11 PM IST

Updated : Oct 10, 2021, 3:40 PM IST

मुंबई - लखीमपूर खीरीमधील केंद्र सरकारच्या जुलमी राजवटीला कारणीभूत असलेल्या केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. शेतकरी हिंसा प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आज (रविवारी) रात्रीपासूनच बंदला सुरुवात होईल, असे मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. तसेच एनसीबीच्या कारवाईवरही मलिक यांनी हरकत घेत, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार आसूड ओढले आहे.

राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक

'केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

लखीमपुर खीरीमध्ये शेतकऱ्यांचे केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु होते. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला. शेतकऱ्यांनी या दबावाला न जुमानल्याने मिश्र यांच्या मुलांने शेतकऱ्यांवर गाडी चढवली. आठ शेतकऱ्यांचा बळी गेला. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने बंदची हाक दिली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, सर्वांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की, उद्याच्या (सोमवार) बंदमध्ये जनता सहभागी होईल आणि केंद्राच्या जुलमी कारवाईचा निषेध करेल. केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठी उभा आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा या प्रकरणात हात असताना त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने त्यानंतर मिश्र यांच्या मुलाला अटक झाली. गृह राज्यमंत्र्यांच्या गावात ही घटना घडली. त्यांनी शेतकऱ्यांना धमकावले. त्यामुळे मिश्रा यांनी राजीनामा दिला पाहिजे. केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असे मलिक यांनी सांगितले.

'क्रुझवरील कारवाई बोगस'

एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरही मलिकांनी काही प्रश्न उपस्थित केले. कारवाईवेळी अकरा लोक होती, त्यापैकी तिघांना एनसीबीने सोडले. आता एनसीबीचे म्हणणे आहे की, अकरा नव्हे तर चौदा जण होते. त्या सर्वांना रात्रभर एनसीबी कार्यालयात आणले. या प्रकरणाचे सर्व फुटेज पाहिले असता, तेरा लोक दिसली. तीन जणांना सोडताना दिसत आहे. हा प्रकार आम्ही प्रसार माध्यमांतून जगजाहीर केला. त्यानंतरही एनसीबीने कार्यालयातून आणखी तिघांना सोडले. ही लोक कोण आहेत? त्यांची फुटेज आणि माहिती जाहीर करा, असे आवाहन मलिक यांनी एनसीबीला केले. तसेच जागेवर पंचनामा करतो, असे एनसीबीचे म्हणणे आहे. परंतु, गेल्या रविवारी साडे आठ वाजता एनसीबीने काही फोटो व्हायरल केले. त्या फोटोत एका खुर्चीवर सीझर आहे. हे फोटो त्यांनी क्राईम रिपोर्टरला पाठवले आहेत. त्याचवेळी एनसीबीने चुकीने एक व्हिडिओही पाठवला. मुळात सीझर घटनास्थळी केले जाते. परंतु, एनसीबीने पाठवलेल्या व्हिडिओत सीझर जहाज टर्मिनलवर नाही तर समीर वानखेडेंच्या टेबलवरचे आहे. कर्टनही वानखेडेच्या कार्यालयातील आहे, हे त्या व्हिडिओ आणि फोटोतून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे क्रुझवरील कारवाई सर्व बोगस असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

'कोणालाही लुबाडले नाही'

एनसीबीच्या कारवाईची पोलखोल केल्यानंतर काही जणांकडून मला शंभर कोटींच्या नोटीसा पाठवणार असल्याचे म्हटले आहे. मी वाट पाहतोय. बऱ्याच कंपन्यांची ब्रँड व्हॅल्यू असते. माझी ब्रँड व्हॅल्यू शंभर कोटींची ठरवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही मलिक यांनी लगावला. तसेच भाजपा नेते मोहीत कंबोज यांच्यावरही मलिक यांनी टीका केली. कंबोज म्हणाले मलिक हे भंगारवाला आहेत. होय, माझे वडील भंगारचा धंदा करायचे याचा अभिमान आहे. मी कधी कुणाला लुटले नाही. मी बँकेचे पैसे बुडवले नाही. ज्यांच्यावर सीबीआयच्या धाडी पाडल्या ते माझ्या कुटुंबीयाचा धंदा काढत आहेत. मी भंगारचा धंदा करतो. पण आम्ही सोन्यात कुणाला बुडवले नाही, अशी खरमखरीत टीका मलिक यांनी केली.

हेही वाचा - ASHISH MISHRA ARREST युपी पोलिसांकडून केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक

Last Updated : Oct 10, 2021, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.