ETV Bharat / city

Sameer Khan Drug case : गुन्हा रद्द करण्यासाठी समीर खान यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका - समीर खान याचिका

मंत्री नवाब मलिक(Minister Nawab Malik) यांचे जावई समीर खान(Sameer Khan) यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका(Petition in Mumbai High Court) दाखल केली आहे. ड्रग प्रकरणात समीर खान यांना एनसीबीने अटक केली होती.

sameer khan
समीर खान
author img

By

Published : Nov 20, 2021, 9:01 PM IST

मुंबई - ड्रग प्रकरणात अटक करण्यात आलेले मंत्री नवाब मलिक(Minister Nawab Malik) यांचे जावई समीर खान(Sameer Khan) यांनी आता गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका(Petition in Mumbai High Court) दाखल केली आहे.

  • काय म्हटले आहे याचिकेत?

समीर खान यांच्याकडे कोणतेही ड्रग सापडले नाही. त्यामुळे त्यांचा रासायनिक अहवाल निगेटिव्ह आहे. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असा दावा याचिकेत केला आहे. एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्यांच्या विरोधात बोगस आणि खोटी तक्रार दाखल केली आहे, असे याचिकेत म्हटले आहे. खान नऊ महिने कारागृहात होते. विशेष न्यायालयाने नुकताच त्यांना जामीन मंजूर केला आहे.

  • समीर खान यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका -

याप्रकरणातील एका सहआरोपीने समीर खान यांचे नाव घेतले होते. त्या जबाबावरुन एनसीबीने समीर खान यांना अटक केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार कोणत्याही आरोपीचा जबाब पुरावा होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्यावर पुरावे नसताना जाणीवपूर्वक आरोप केले आहेत, असा दावा खान यांनी केला आहे. केवळ अन्य आरोपींनी आरोप केले या हेतूने माझ्यावर गैरप्रकारे कारवाई केली आहे. माझ्याजवळ कोणतेही ड्रग सापडले नाहीत. त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी समीर खान यांनी केली आहे. एनसीबीने खान यांच्यावर कट कारस्थानाचा आणि ड्रग बाळगल्याचा आरोप केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.