ETV Bharat / city

Jayant Patil Criticized Raj Thackeray :...तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करायचे नाहीत; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला - तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करणार नाही

महाराष्ट्राचे कौतुक करायचे नाहीत, असे ठरवले असेल तर मग दुसर्‍या राज्याचे कौतुक ते करणारच, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Water Resources Minister Jayant Patil ) यांनी राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचे नाव न घेता लगावला. राज ठाकरे यांनी युपीच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मशिदीवरील लाऊडस्पीकर ( Raj Thackeray Appreciates UP Government On Loudspeaker Issue ) उतरल्यामुळे कौतुक केले होते.

जयंत पाटील संग्रहित छायाचित्र
जयंत पाटील संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 29, 2022, 5:39 PM IST

Updated : Apr 29, 2022, 5:47 PM IST

मुंबई - जोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज ठाकरेंचे बंधू आहेत, तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करायचे नाहीत, असे ठरवले असेल तर मग दुसर्‍या राज्याचे कौतुक ते करणारच, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Water Resources Minister Jayant Patil ) यांनी राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचे नाव न घेता लगावला. राज ठाकरे यांनी युपीच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मशिदीवरील लाऊडस्पीकर ( Raj Thackeray Appreciates UP Government On Loudspeaker Issue ) उतरल्यामुळे कौतुक केले होते. याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.

प्रतिक्रिया देताना मंत्री जयंत पाटील

'आधी गुजरातचेही कौतुक केले होते' : एकदा गुजरातचे कौतुक करुन झाले आता युपीचे कौतुक करत आहेत. महाराष्ट्र सोडून सर्व राज्याचे कौतुक करायला दौरे करतील. दुसर्‍या राज्यात जाऊन त्या राज्यांचे कौतुक राज ठाकरे करतच राहणार आहेत असेही जयंत पाटील म्हणाले. मुंबईतील हिंदी भाषिक मनसेच्या वागण्यामुळे कितीतरी लांब जातील याची भाजपाला माहिती देखील माहिती आहे.

'युतीची चर्चा झाली नाही' : शिवसेना होती म्हणून विरोध करण्याचा प्रश्न नव्हता. मुळात चर्चा झालीच नाही तर विरोध करण्याचा प्रश्न येतो कुठून. आमची कॉंग्रेसबरोबर आघाडी होती. आमची आघाडी विरोधी पक्षाचे काम करत होती. त्यामुळे भाजपाला आमच्याशी चर्चा करायची गरज का वाटली असा उलट सवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाकडून सुरू असलेल्या युतीच्या चर्चेला उत्तर देताना केला. आमच्याशी भाजपाने चर्चा का केली. त्यातून शिवसेनेला बाजूला करा असे म्हणत असू तर या सगळ्या हवेतील गप्पा आहेत. तुम्ही सत्तेत असताना तुमच्याबरोबर तुमचा मित्र पक्ष असताना तुम्ही राष्ट्रवादीबरोबर चर्चा का केली? हा प्रश्न भाजपाला जयंत पाटील यांनी विचारला आहे.

'महागाईचे मुळ केंद्रात' : भारतात प्रचंड महागाई वाढलेली आहे. त्याचे दुष्परिणाम शेजारच्या देशात म्हणजे श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील महागाईची जबाबदारी राज्याराज्यावर टाकून हात झटकण्याचा प्रयत्न आहे. खरे महागाईचे मुळ केंद्रात आहे हे विसरता येणार नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी केंद्रावर निशाणा साधला. केंद्रसरकार कुठल्याही राज्याला आऊट ऑफ वे जाऊन फारशी मदत करु शकत नाही. योजना असतात त्या योजनांवर पैसे येत असतात. असे एकाच राज्याला जास्त पैसे देणे या ज्या घोषणा मोदीसाहेब वेगवेगळ्या राज्यात जाऊन करतात, मात्र तसे ते देऊ शकत नाहीत. पण काय करणार देशाचे पंतप्रधान बोलत असल्याने लोकं ऐकून घेतात, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

हेही वाचा - Raj Thackeray : राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना, विविध ठिकाणी जंगी स्वागत

Last Updated : Apr 29, 2022, 5:47 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.