मुंबई - रोजगार आणि नोकरी हा अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये राज्य सरकारने कोरोना काळात नोकर भरती थांबविली होती. ती आता सुरू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या दृष्टीने महत्त्वाची पावले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उचलली आहेत. राज्यात दहा हजारांपेक्षा अधिक नोकर भरती सुरू करण्यात ( more than 10 thousand gov jobs in MH ) येत आहे. याविषयी आपण राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार ( Solapur Guardian Minister Face to Face interview ) आहोत.
कोरोना संकटामुळे आपल्याला परीक्षा घेता आल्या नाहीत. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व सहकारी मंत्र्यांनी मुलांना न्याय देण्यासाठी निर्णय घेतला. या परीक्षा आता पूर्ववत सुरू झाल्या पाहिजेत. त्यासाठी निर्णय घेऊन या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधारणत: 15 हजार 511 रिक्त पदेही भरण्याची विधानसभेत घोषणा केली होती. त्यानंतरज आपल्याकडे आठ हजार पदाची भरती करण्याची मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राप्त ( recruitment demand letter by MPSC ) झाले. त्यापैकी गट अ २३०७ गट ब १३८३ गट क १५८३ असे एकूण ५२७३ पदाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याप्रमाणे पुढील कारवाई सुरू झाली आहे.
आरक्षणाच्या कारणामुळे न्यायालयात काही विद्यार्थी गेल्यामुळे भरती करता येत नव्हती. तर राज्यसेवेच्या ४१६ जणांना रुजू करून घेतले आहे. दुसरे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, एमपीसीच्या माध्यमातून पूर्वी पीडब्ल्यूडी, जलसंधारण, जलसंपदा विभागाचे इंजिनिअर लोकांसाठी क्लासवन परीक्षा घेतली होती. काल आपण जाहीर केलेल्या साधारणपणे 1125 विद्यार्थ्यांपैंकी 825 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली. त्याचप्रमाणे पीएसआय पदाच्या परीक्षा झाल्या आहेत. साधारण दहा ते पंधरा दिवसांमध्ये या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल लागणार आहे. पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 432 पदावर आपण त्यांना नियुक्ती दिलेली आहे. तसेच वनसेवा संवर्गातील 100 पदाचा निकाल घोषित करण्यात आला आहे. त्यांची नियुक्ती कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. अजूनही राहिलेल्या जागा आहेत. त्यांची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करून भरती केली जाणार ( Dattatray Bharane on Gov jobs ) आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता परीक्षेची तयारी करावी. या स्पर्धेला आपण सर्वांनी सामोरे जावे.
प्रश्न - या कालावधीमध्ये आपण पाहिले की काही विद्यार्थ्यांची एक दोन वर्षे वाया गेली आहेत. त्यांना परीक्षा देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला ( gov jobs age limit extension ) होता. नेमका काय निर्णय आहे?
दत्तात्रय भरणे - आपल्या सगळ्यांना माहीत आहे, की खरेतर काही विद्यार्थ्यांनी खूप तयारी होती. परंतु त्यांच्या पात्रतेची वयोमर्याद संपल्याने त्यांना परीक्षा देता येत नव्हत्या. यासाठी मी स्वतः राज्यमंत्री या नात्याने स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांना सांगितले की या विद्यार्थ्यांची अडचण आहे. या विद्यार्थ्यांचे वय संपल्यानंतर आपण एक वर्ष संधी दिली पाहिजे. मंत्रिमंडळ आणि आमच्या सर्व सहकार्याने एक सहानुभूतीचा विचार करून सर्वांना मुदतवाढ दिली आहे
प्रश्न - परीक्षा झाल्या नसल्याने मधल्या काळामध्ये खूप गोंधळ झाला आहे. आपला आयोगाचे अध्यक्ष आणि तीन सदस्य आहेत. मधल्या काळात सदस्य संख्याही नव्हती. हे सगळे पाहता नेमके या संदर्भामध्ये राज्य सरकार काय करते?
हेही वाचा-Arvind Kejriwal Khalistan Issue : कुमार विश्वास यांच्या आरोपावर अरविंद केजरीवाल यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
दत्तात्रय भरणे- या संदर्भामध्ये आपणा सर्वांना माहीत आहे, की पूर्वीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व इतर सदस्य अशा रिक्त जागा भरल्या आहेत. अजून दोन पद रिक्त पदे रिक्त होती. पण लवकर भरण्याची कार्यवाही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांच्यावतीने लवकर करण्यात ( Vacant posts in MPSC board ) येईल. पण तरीही आज मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की आज किशोर राजे निंबाळकर अध्यक्ष हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. ते एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी झाले. तर त्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. केरळ राज्याप्रमाणे सदस्य संख्या कशी वाढवता येईल, यासाठी आमचा प्रयत्न आहे,
प्रश्न - नियुक्तीपत्र आपण मुलाखत झाल्यानंतर साधारण किती दिवसात देता? पोलीस विभागासाठी भरतीची काय प्रक्रिया असते? किती जणांच्या नियुक्तीला मान्यता देत आहोत?
दत्तात्रय भरणे- माझ्याकडे आता लगेच आकडा नाही. परंतु आपल्याला माहीत आहे की मुलांचे भरतीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचा आग्रह असतो. त्यांनी त्याप्रमाणे मुलांच्या भरतीचे प्रश्न मार्गी लावले. कदाचित मार्च व एप्रिलमध्ये अजून नवीन भरती करण्याचा निर्णय घेण्यात येईल. राज्यसेवेच्या माध्यमातून 416 जणांची नियुक्ती करत आहोत.
हेही वाचा-Congress Protest Against Girish Bapat : गिरीष बापटांच्या घराबाहेर काँग्रेसचे 'माफी मांगो' आंदोलन
प्रश्न - राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जर आपण पाहिले तर राज्यात नंबर एकचा पक्ष करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात. सगळेच राष्ट्रवादीचे नेते करत आहेत, असे सांगितले जात आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत बऱ्यापैकी यश मिळवलेल्या पक्षाला बळकटी देण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
दत्तात्रय भरणे - आपणा सर्वांना माहीत आहे, की हे सरकार हे महाविकास आघाडीचे सरकार आहे. शेवटी उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब थोरात त्यांच्या वरच्या पातळीला आघाडीचा निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य आहे. परंतु प्रत्येकाचा पक्ष हा मोठा व्हावा. पक्षातील कार्यकर्त्यांना वेगळ्या ठिकाणी संधी मिळावी. पक्षाच्या माध्यमातून विकासाची कामे मार्गी लावतात. शेवटी ध्येय धोरण असते. त्यामुळे विशिष्ट प्रकारे प्रत्येक पक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आघाडी करायची की नाही हे वरिष्ठ ठरवतील. परंतु निश्चित प्रकारे प्रत्येक जण पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत असतो. पक्षाच्या संघटनेला महत्व देऊन संघटनेच्या कार्यकर्त्याला बळ देणारा त्यांच्या पाठीमागे उभा राहणे ही भूमिका राहणार आहे.
प्रश्न - इंदापूर मतदारसंघामध्ये आपण हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. वर्चस्व मिळविले. आता नेमकी कशी परिस्थिती आहे? पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची पकड घट्ट व्हावी, यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
दत्तात्रय भरणे- अजित पवार आणि लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे हे दोन व्यक्ती आमच्या जिल्ह्यासाठी आणि मतदारसंघासाठी सातत्याने मदत करीत असतात . अजित पवार जरी राज्याचे उपमुख्यमंत्री असले शेवटी आपले घर महत्वाचे आपला जिल्हा महत्वाचा आहे. प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यामध्ये एक दिवस येऊन सगळ्या अधिकाऱ्यांची व पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे सर्वांना मदत करत असतात. सहकार्य करत असतात. शेवटी पक्ष वाढला पाहिजे. पक्षाच्या संघटनेच्या कार्यकर्त्याला बळ दिले पाहिजे. आज जरी सुप्रिया या दिल्लीमध्ये जरी खासदार असल्या तरी त्या बारामती लोकसभा मतदारसंघाकरिता खूप वेळ देतात. इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास झाला. गोरगरीब नागरिकांना चांगला न्याय देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सगळीच मंडळी मदत करीत असतात. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष हा इंदापूर तालुक्यात तुम्हाला मजबूत झालेला दिसेल.