ETV Bharat / city

राज्यात 2022 पर्यंत होणार गुणसंवर्ध‍ित तांदळाचे वितरण - मंत्री भुजबळ

ॲनिमिया आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून 2022 पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाईड राईस ( Fortified Rice ) वाटप करण्यात येणार आहे. या तांदळाच्या वितरणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) यांनी दिले.

मंत्री भुजबळ
मंत्री भुजबळ
author img

By

Published : Dec 20, 2021, 7:44 PM IST

मुंबई - ॲनिमिया आजाराचे ( Anemia Diseases ) समूळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून 2022 पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाईड राईस ( Fortified Rice ) वाटप करण्यात येणार आहे. या तांदळाच्या वितरणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गुणसंवर्धित तांदुळाच्या वितरणाचे प्रमाण वाढविणे व इतर उपाययोजना संदर्भात बैठक झाली. या बैठकीत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री भुजबळ यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला अन्न, नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, शिधावाटप नियंत्रक कान्हूराज बगाटे व वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक रविंद्र सिंघल, सहसचिव सुधीर तुंगार यावेळी उपस्थित होते.

तांदळाचे वितरण सुरू

केंद्र शासनाने 2024 पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांना शंभर टक्के फोर्टीफाईड राईस उपलब्ध करून देण्याबाबतची योजना आखली आहे. त्यासाठी केंद्राकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशातील तामिळनाडू, तेलंगाणा, हरियाणा, मध्यप्रदेश या राज्यांनी शंभर टक्के गुणसंवर्धित तांदळाचे वितरण सुरू केले आहे.

तांदूळ वितरणासाठी गडचिरोली जिल्ह्याची निवड

केंद्र शासनाकडून फोर्टीफाईड राईस वितरणासाठी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सार्वजनिक वितरण प्रणालीतून गुणसंवर्धित तांदळाचे वितरण सुरू आहे. केंद्रशासनाच्या निर्देशानुसार राज्यात प्रशासकीय यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या.

खबरदारी घेऊन कार्यवाही करावी

गडचिरोली जिल्ह्यात ज्याप्रमाणे यशस्वीपणे गुणसंवर्धित तांदळाचे ( Fortified Rice ) वितरण सुरू आहे. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यात कार्यवाही करावी. जेणेकरून ॲनिमिया आजाराचे समूळ उच्चाटन होण्यास मदत होईल. 26 जानेवारी, 2022 पर्यंत राज्यात ही योजना सुरू होईल याबाबत सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे, असे निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले आहेत.

यामुळे होतो ॲनिमिया आजार

देशात आणि राज्यात ॲनिमियाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. ॲनिमिया प्रामुख्याने रोजच्या जेवणात जिवनसत्त अ, ब-9 व ब-१२ या पोषणद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येतो. संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की, पुरेशा प्रमाणात जेवणातून लोह व इतर पोषक द्रव्य मिळाल्यास ॲनिमिया मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणता येतो. राज्यात या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेवून कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या.

हे ही वाचा - Maharashtra winter session 2021 : हिवाळी अधिवेशनात निवडला जाणार विधानसभेचा अध्यक्ष - बाळासाहेब थोरात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.