ETV Bharat / city

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना कोणताही त्रास नाही - मंत्री छगन भुजबळ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादेत

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना कोणताही त्रास नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. उलट भाजपा सरकारनेच अनेकवेळा शिवसेनेची अवहेलना केली आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद येथे भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

author img

By

Published : Sep 17, 2021, 1:04 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना कोणताही त्रास नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. उलट भाजपा सरकारनेच अनेकवेळा शिवसेनेची अवहेलना केली आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद येथे भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

राजकारणात सगळेच मित्र असतात, विरोधी पक्षात दुश्मन नसतात असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. मुख्यमंत्री त्रस्त आहेत असं वाटत नाही असे भुजबळ म्हणाले. निवडणुका डोक्यावर आलेल्या आहेत. त्यानुसार आमचा प्रयत्न आहे की, ओबीसीला राजकीय आरक्षण मिळावे. आम्ही यासाठी न्यायालयात सुद्धा गेलो आहेत. तसेच येत्या 23 तारखेला न्यायालायत सुनावणी आहे असे भुजबळ म्हणाले. ओबीसी समाजाची जनगणना करण्याची मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेली आहे. याची जाणीव सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना करून दिलेली आहे, असे भुजबळ म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.