ETV Bharat / city

Mini Lockdown In Mumbai? : मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन लावण्यापेक्षा मिनी लॉकडाऊन बरा - किशोरी पेडणेकर - मुंबई कोरोना रुग्णसंख्या

मुंबईत नव्या कोरोनाबाधितांचा ( Corona Virus in Mumbai ) आजचा आकडा थेट 20 हजारांच्या पार गेला आहे. मुंबईत (Mumbai) गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar on Corona ) यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. सद्यपरिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊन ( Complete Lockdown in mumbai ) करण्याचा कोणताही विचार नाही आहे. पण मुंबईच्या नागरिकांनी गांभीर्यानं नियमांचं पालन करावं, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

Mayor Kishori Pednekar
किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Jan 7, 2022, 1:44 PM IST

मुंबई - मुंबईत नव्या कोरोनाबाधितांचा ( Corona Virus in Mumbai ) आजचा आकडा थेट 20 हजारांच्या पार गेला आहे. मुंबईत गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar on Corona ) यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. सद्यपरिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊन ( Complete Lockdown in mumbai ) करण्याचा कोणताही विचार नाही आहे. पण मुंबईच्या नागरिकांनी गांभीर्यानं नियमांचं पालन करावं, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

मिनी लॉकडाऊन बरा -

मुंबईत कोरोनाच्या प्रसारामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिक धास्तावले आहेत. काही बेफिकीर नागरिकांमुळे रुग्ण संख्या वाढत राहिली, तर काही कठोर पावले उचलली जाऊ शकतात. रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिका सज्ज आहे. यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. तसेच संपूर्ण लॉकडाऊन लावण्यापेक्षा मिनी लॉकडाऊन बरा ( mini lockdown in mumbai ) असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे.

मिनी लॉकडाऊन परवडण्यासारखा -

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार वाढला असून रुग्णसंख्या दिवसाला २० हजाराच्या वर रुग्णसंख्या गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना, मुंबईत काल २०१८१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ११७० रुग्णांना रुग्णलयात दाखल करावे लागले. सध्या १६.८ टक्के बेडवर रुग्ण असून इतर बेड्स रिक्त आहेत. २२ हजार २२२ बेड्स गंभीर आणि जास्त लक्षण असणाऱ्यांसाठी आहेत. २० हजाराच्यावर रुग्णसंख्या गेल्यावर लॉकडाऊन लावू असे मागे म्हटलं होतं, पण टक्केवारी वाढली तर खूप काळजी घ्यावी लागेल. दुसरी लाट आपण जशी रोखली, तशी रोखण्यासाठी घालून दिलेले निर्बंध पाळायला हवेत. रुग्णसंख्या लोक धास्तवले आहेत, संपूर्ण लॉकडाऊन सध्या तरी होणार नाही. पण जर काही बेफिकीर नागरिकांमुळे रुग्ण संख्या वाढत राहिली, तर काही कठोर पावलं उचलली जाऊ शकतात. मिनी लॉकडाऊन सगळ्यांना परवडण्यासारखा आहे असे महापौर म्हणाल्या.

मुख्यमंत्री निर्णय घेतील -

मुख्यमंत्री आणि इतर मंत्री माझ्या नागरिकांना कसं वाचवता येईल याबाबत सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतायत. माझ्या माहितीनुसार स्वतः मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि शरद पवार निर्णय घेतील. शनिवार आणि रविवारी मुंबईतून जा ये करणाऱ्यांची संख्या जास्त असते. हळुवार पण खंबीर निर्णय कदाचित संध्याकाळी ७ वाजेपर्यंत येऊ शकतो. मुख्यमंत्री सकारात्मक विचाराने चालले आहेत. ते घीसडघाईने निर्णय घेणार नाहीत. आज संध्याकाळ पर्यंत कळेल. पंतप्रधान आज संध्याकाळी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

ओमायक्रॉनला गांभीर्याने घ्यावे -

जागतिक आरोग्य संघटना ओमायक्रॉन गंभीर नाही असे म्हणत आहे. मात्र तो गंभीर नाही असे समजू नका. त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. आमची यंत्रणा सज्ज आहे, पण सज्ज आहोत म्हणजे त्याचा फज्जा उडवू नका. काही लोक आरोप प्रत्यारोप करतात, मात्र त्यांनीही कोरोना, ओमायक्रॉनला गांभीर्याने घ्यावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.

गर्दी टाळणे गरजेचे -

धारावी सोबतच के ईस्ट, के वेस्ट, हायराईज इमारतींमध्ये मोठी रुग्णवाढ होत आहे. लोकल ट्रेन पंधरा मिनिटांनी आली तर मोठी गर्दी होते. त्यामुळे वर्क फ्राॅम होम आणि कामाच्या वेळेत बदल करणं पर्याय असल्याचे महापौर म्हणाल्या.

ऑन सेल्फ टेस्ट परफेक्ट नसतात -

मुंबईत काही ठिकाणी सेल्फ टेस्ट केल्या जात आहेत. जे कोणी असं करत आहेत ते स्वत:ला फसवतायत. नागरिकांना कळायला पाहिजे की अशा टेस्ट केल्या तर त्या परफेक्ट नसतात. जर तुम्हाला जर लक्षणे जास्त असतील तर अशावेळी डाॅक्टर आणि पालिका प्रशासनाला माहिती दिल्यास तुमच्यावर वेळेवर उपचार करता येऊ शकतात असे महापौर म्हणाल्या.

मुंबईतील ओमायक्रॉनची संख्या -

मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून १५,५२३ प्रवासी आले. त्यामधील १८६ प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. १ नोव्हेंबर पासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात २६२ प्रवासी कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या अतिजोखमीच्या सहवासातील ३६ रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉजिटीव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही, पुणे) येथे जीनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत परदेश प्रवास केलेले ३०२ तसेच २६१ अशा एकूण ५६३ जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. एकूण ५६३ पैकी २८६ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले -

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत प्रचंड वाढ होताना दिसत ( Covid Outbreak In Maharashtra ) आहे. गुरुवारी मागील 24 तासांत 36 हजार 365 बाधितांची नोंद ( New Covid Cases In Maharashtra ) झाली. त्यापैकी मुंबईत सुमारे 20 हजार रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूदर कमी झाला आहे. आज एकूण 13 रुग्ण दगावले आहेत. तर दुसरीकडे ओमायक्रॉन या नव्या व्हेरीयंटचे 79 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचे आठ हजार 907 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. ही दिलासादायक बाब आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( Maharashtra Health Department ) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.

केईएम रुग्णालयात डॉक्टर पॉझिटिव्ह -

मुंबईमध्ये डिसेंबरपासून रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रसार सुरू झाला आहे. या प्रसाराला रोखण्याचे काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. गेल्या ५ दिवसात मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील १४० जण पाॅझिटिव्ह आढळले ( KEM Hospitals Doctors Covid Positive ) आहेत. त्यांच्यापैकी बहुतेक बरे झाले आहेत.

हेही वाचा - KEM Hospital Doctors Covid Positive : केईएम रुग्णालयात ५ दिवसांत १४० डॉक्टर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.