ETV Bharat / city

आम्ही आलो तर जमावबंदी, राहुल गांधी आले तर 144 लावाल का? : असदुद्दीन ओवैसी

मुंबईत एमआयएमची तिरंगा रॅली
असदुद्दीन ओवैसी
author img

By

Published : Dec 11, 2021, 11:52 AM IST

Updated : Dec 11, 2021, 10:46 PM IST

21:47 December 11

शिवसेना राष्ट्रवाद विसरली का?

असदुद्दीन ओवैसी - अध्यक्ष, एमआयएम

मुंबई - 'थ्री इन वन' सरकार मुस्लिम आरक्षण विसरले आहे. शिवसेना राष्ट्रवाद विसरली का? असा प्रश्न असदुद्दीन ओवैसी यांनी विचारला आहे. तसेच महाराष्ट्रातील 83 टक्के मुसलमान नागरिकांकडे जमिनी नाहीत, असे ओवैसी म्हणाले.

19:27 December 11

आम्ही सरकारकडे आमची मागणी मांडतोय; त्यामुळे हे सगळं करण्याची गरज नाही- इम्तियाज जलील

खासदार इम्तियाज जलील प्रतिक्रिया

नवी मुंबई - मुस्लिम आरक्षण आंदोलन अनेक वर्षापासून सुरु आहे. राज्यातील अनेक पक्ष-संघटना मुस्लिम आरक्षणासाठी लढा देत आहेत. आम्ही आमच्या मागण्या सरकारकडे शांतपणे मांडत आहोत. त्यामुळे सरकारला हे सगळं करण्याची गरज नाही, असे वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केले आहे.

19:04 December 11

खासदार इम्तियाज जलील यांचा ताफा थोड्याच वेळात सभास्थळी होणार दाखल

मुंबई - खासदार इम्तियाज जलील यांचा ताफा थोड्याच वेळात चांदिवली येथील सभास्थळी दाखल होणार आहेत. तसेच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवीसी हेदेखील काही वेळात सभास्थळी येत आहेत.

18:50 December 11

सभास्थळी गर्दी होण्यास सुरुवात, पोलिसांनी परवानगी नाकारली

सभास्थळावरून प्रतिनिघींनी घेतलेला आढावा

मुंबई - मुस्लिम आरक्षण आणि वक्फ जमिनीचे संरक्षण या मागणीसाठी एमआयएमकडून औरंगाबाद येथून तिरंगा रॅली मुंबईपर्यंत काढण्यात आली. यानंतर मुंबईत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी चांदिवली येथे सभा घेत आहेत. आजच्या तिरंगा रॅलीला अनेक ठिकाणी पोलिसांतर्फे अडवण्यात आले. तसेच मुंबईत जमावबंदी आहे. या सभास्थळी गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे.

18:48 December 11

18:16 December 11

सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, सभा घेण्यावर एमआयएम ठाम

नवी मुंबईत एमआयएमची रॅली

मुंबई - एमआयएमच्या रॅलीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. परवानगी नसतानाही एमआयएमने रॅली काढली आहे. संध्याकाळी मुंबईत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींची सभा आहे. या सभेलाही पोलिसांची अद्याप परवानगी नाही. तरीही एमआयएम सभा घेण्यावर ठाम आहे. असदुद्दीन ओवेसींच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या चांदिवली भागात आज रॅली होणार आहे.

17:28 December 11

..म्हणून एमआयएमच्या सभेला नाकारली परवानगी, गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई- मुंबईत ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार मुंबईत कोणत्याही प्रचारसभा, रॅली किंवा मोर्चे काढता येणार नाही. कोणत्याही पक्षाचा धोका आहे म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेतलेला नसल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.

17:23 December 11

मुलुंड चेकपोस्टवर अनेक वाहनांना पोलिसांनी अडवले

ठाणे मुलुंड वेशीवर म्हणजेच मुलुंड चेकनाक्यावर तिरंगा रॅलीमध्ये शामील होणाऱ्या वाहनांना थांबवण्यासाठी सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आला होता. आता पोलिसांनी वाहन तपासण्यास सुरवात केलीय आणि त्यात अमरावतीवरून तिरंगा रॅलीत सामील होण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्यात. त्यामध्ये 25 ते 30 जण दोन दिवसाचा प्रवास करत रॅलीत सामील होण्यास जात होता. आतापर्यंत जवळपास 40 वाहनांना अडवण्यात आले आहे. आज- उद्या देखील अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार आहे. कारण मुंबईमध्ये जमावबंदी कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

17:06 December 11

एमआयएमच्या तिरंगा रॅलीसाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या गाड्यांना वाशी टोल नाक्यावर अडवले. 8 ते 10 जण पोलिसांच्या ताब्यात.

एमआयएमच्या तिरंगा रॅलीसाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या गाड्यांना वाशी टोल नाक्यावर अडवले.

मुंबईत ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत सभा, रॅलीला परवानगी नाही. मात्र तरीही मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमने आक्रमक पवित्रा घेत रॅली काढणारच असा निर्णय घेतला आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र मुंबईकडे तिरंगा रॅलीसाठी जाणाऱ्या वाहनांना वाशी टोल नाक्यावर अडवले जात आहे. रॅलीकरता जाणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे. मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर देखील एमआयएमच्या तिरंगा रॅली करता जाणारी वाहने अडवली जात आहेत. या रॅलीकरिता जाणाऱ्या 8 ते 10 एमआयएमच्या कार्यकर्त्यांना वाशी टोल नाक्यावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाशी टोल नाक्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

16:15 December 11

ठाण्यात आनंदनगर चेकपोस्टवर अनेक गाड्या पोलिसांनी अडवल्या. अनेकांना मुंबईमध्ये जाण्यापासून रोखले.

15:44 December 11

राज्य सरकार जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी देत नसल्याचा आरोप

मुंबईला निघालेले खासदार इम्तियाज जलील यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना आरक्षण हा हक्क असल्याचा पुनरोच्चार केला. मुस्लिमांच्या मतावर निवडून यायचे आणि नंतर त्यांना विसरायचे ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दुटप्पी भूमीका असल्याची टीका त्यांनी केली. राज्य सरकार जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी देत नसल्याचा आरोप ही त्यांनी केला. मुंबईकडे जात असताना रावेत इथं त्यांनी जेवणासाठी थांबले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

15:10 December 11

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मोर्चाला बंदी असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

14:07 December 11

मोर्चा चाकण येथील शिक्रापूर येथून निघाला असून ते थोड्याच वेळात पिंपरी चिंचवड येथील रावत या ठिकाणी थांबणार

पुणे - मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाकडून औरंगाबाद ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला आहे. थोड्याचवेळात हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकेल.आत्ता हा मोर्चा चाकण येथील शिक्रापूर येथून निघाला असून ते थोड्याच वेळात पिंपरी चिंचवड येथील रावत या ठिकाणी थांबणार आहे.

13:21 December 11

नाशिक - मालेगावमधून तिरंगा यात्रेला निघालेल्या एम आय एमच्या कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध

मालेगावमधून तिरंगा यात्रेला निघालेल्या एम आय एमच्या कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध

उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.खालिद परवेज यांच्यासह कार्यकर्त्यांना त्यांच्याच फार्महाऊसवर केले स्थानबद्ध

मोर्चेकरी मोर्चात सहभागी होण्याच्या मुद्द्यावर ठाम

मालेगावमध्यचे आमदार मुफ्ती इस्माईल मात्र मालेगावात नाहीत

13:17 December 11

खासदार इम्तियाज जलील हे पुण्याहून मुंबईला काही वाहनसोबत रवाना

मुस्लिम आरक्षण या प्रमुख मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील हे पुण्याहून मुंबईला काही वाहनसोबत जात आहेत.

यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते असणार आहेत.

पिंपरी चिंचवडच्या स्थानिक कार्यकर्त्याने दिली माहिती

दुपारच्या सुमारास पुणे-बंगलोर हायवे याठिकाणी जेवण्यासाठी थांबणार आहेत

13:02 December 11

मुंबई ठाण्याच्या वेशीवरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त. एमआयएमची तिरंगा रॅली रोखण्यासाठी पोलिसांनी केली उपाययोजना.

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम पक्षाकडून तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे. मात्र मुंबईत प्रवेश नसल्याने मुंबईच्या सीमेवर पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत.
मुंबईच्या वेशीवर मुलुंड, आनंद नगर जकात नाका येथे नवघर पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दल यांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॅरिकेटिंग लावण्यात आलेली आहे. याच संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज देवकर यांनी..

12:21 December 11

रॅली पुणे किंवा मुंबई येथे अडवली जाऊ शकते

मुंबईमध्ये 12 डिसेंबरपर्यंत नवे निर्बंध लावण्यात आल्याने, रॅली सभा घेता येणार नाही असे सांगितलं जात आहे

मात्र कांदिवली येथे परवानगी असल्याचे जलील यांनी सांगितले आहे

12:05 December 11

जलील यांच्या रॅलीला मुंबईत प्रवेश करु देणार नाही - गृहमंत्री

जलील यांच्या रॅलीला मुंबईत प्रवेश करु देणार नाही. गृहमंत्र्यांची माहिती. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

11:53 December 11

खा. जलील यांचा ताफा नगर जिल्ह्यातून पुण्याकडे रवाना

अहमदनगर - खा. जलील यांचा ताफा नगर जिल्ह्यातून पुण्याकडे रवाना, पोलिसांनी अडवले नाही

11:52 December 11

ताफा नगर जिल्ह्यात नेवासे जवळ, बॅरिकेटिंग मुळे अडचणी-जलील

आरक्षणासाठी मुंबई गाठणार - जलील यांची स्पष्टोक्ती

11:26 December 11

मुंबईमध्ये आज मुस्लिम आरक्षणासाठी (Muslim Reservation) एमआयएमची तिरंगा रॅली

मुंबई : मुस्लिम आरक्षणाच्या (Muslim Reservation) मुद्द्यावरून एमआयएमची कार रॅली मुंबईमध्ये (MIM Car Rally Mumbai) पोहोचणार आहे. मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीसाठी खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांच्या नेतृत्वामध्ये ही कार रॅली काढण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रॅली सुरु होण्यापूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केलं. आमच्या हक्काचं आरक्षण मागण्यासाठी आम्ही तिरंगा रॅली घेऊन येत आहोत, असं त्यांनी म्हटलं.

Last Updated : Dec 11, 2021, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.