ETV Bharat / city

एमआयएमचे नेते शामसुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल, पत्निने दिली होती तक्रार - Fir against shamshulla Choudhary

अनैसर्गिक संभोगाची सक्ती करणे तसेच अन्य महिलांची अनैतिक संबंध ठेवणे, फसवून दुसरे लग्न करणे अशा अनेक बाबतीत सभा चौधरी यांनी आपले पती आणि एम.आय.एमचे नेते शमसुल्ला चौधरी यांच्या विरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून दबावाखाली असलेल्या पोलिसांनी अखेरीस गुन्हा शामसुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

एमआयएमचे नेते शामसुल्ला चौधरी
एमआयएमचे नेते शामसुल्ला चौधरी
author img

By

Published : Oct 25, 2021, 10:07 AM IST

मुंबई - जीवे मारण्याची धमकी देणे, अनैसर्गिक संभोगाची सक्ती करणे तसेच अन्य महिलांची अनैतिक संबंध ठेवणे, फसवून दुसरे लग्न करणे अशा अनेक बाबतीत सभा चौधरी यांनी आपले पती आणि एम.आय.एमचे नेते शमसुल्ला चौधरी यांच्या विरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून दबावाखाली असलेल्या पोलिसांनी अखेरीस गुन्हा शामसुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

घटस्फोटित पत्नीवर अन्याय झाल्याचा दावा

अंधेरी साकीनाका येथील एम. आय एम'चे नेते शामसुल्ला चौधरी यांच्या विरोधात वकिल नवीन चोमल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये शामसुल्लाकडून घटस्फोटित पत्नीवर अन्याय झाल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही शामसुल्ला यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

हुंड्यासाठी वारंवार छळ केल्याचा आरोप

शामसुल्ला यांची पहिली पत्नी सबा हिने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सबा हिच्याशी शामसुल्ला यांनी लग्न केल्यानंतर तिच्यावर अनन्वित छळ केल्याचा आरोप तिने यामध्ये केला आहे. यामध्ये तिला जीवे मारण्याची धमकी देणे, अंगावर ॲसिड फेकण्याची धमकी देणे, अनैसर्गिक संभोग करण्याची सक्ती करणे, तसेच माहेरहून वारंवार हुंड्यासाठी तगादा लावणे असे अनेक आरोप केले आहेत. शामसुल्ला यांनी अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोपही सबा हिने केला आहे. यासंदर्भात दीर रमजान आणि सासरे जैनुद्दीन यांना सांगितले असता त्यांनी दुर्लक्ष केले, उलट रमजान याने लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तिने केला आहे. दरम्यान, शामसुल्ला याने आपल्याकडून सुमारे 15 लाख रुपये विविध कारणांसाठी उकळले आहेत, तसेच लग्नात देण्यात आलेले 45 तोळे सोने ही या कुटुंबातील व्यक्तींनी चोरल्याचा आरोप सबा हिने केला आहे. सबा हिला चार वर्षांची मुलगी साधिया असून सध्या ती आपल्या माहेरी राहत आहे.

गुन्हा दाखल

काही दिवसापूर्वी जैगून नावाची महिला आपल्याला भेटली होती. तिनेही शामसुल्ला अत्याचार करीत असल्याचे सांगितले होते. यावेळेस शमसूला याने तिला आपल्या घरी येऊन मारहाण केल्याचेही सबाने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान. यासंदर्भात साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये शामसुल्ला याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला असून अद्याप या प्रकरणी चौकशी सुरू असून कोणालाही अटक झाली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे.

हेही वाचा - पुणे : आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार; विद्यार्थ्यांचे भविष्य दावणीला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.