मुंबई - कोण मिलिंद नार्वेकर? तोच ना बॉयचं काम करायचा, असा खोचक टोला नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत लगावला. यावर नार्वेकर यांनी रेणेंची फिरकी घेतली. मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी दिवसातून सात वेळा कॉल करायचेत हे विसरलात का.? असा चिमटा काढत नार्वेकर ( Milind narvekar tweet on narayan rane comment ) यांनी राणेंची फिरकी घेतली.
![milind narvekar tweet on narayan rane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14487898_hy.jpg)
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजप नेत्यांचे संबंध यावर हरकत घेतली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई उपस्थित नव्हते, अशी विरोधकांकडून टीका सुरू आहे. त्याबाबत पत्रकारांनी नारायण राणे यांना विचारले असता, कोण मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो… माझ्यासमोरची गोष्ट आहे. मी पाहिलं आहे, बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारा आज नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ, अशा शब्दात राणेंनी मिलिंद नार्वेकरांची खिल्ली उडवली. राणेंच्या या टीकेला आता मिलिंद नार्वेकर यांनीही ट्विट करत प्रत्युत्तर दिले.
बॉय का? अच्छा! स्वत:च्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचे विसरलात? वाजला का नाही तुमच्या मेमरीची घंटी? असे ट्विट करत मिलिंद नार्वेकर यांनी नारायण राणे यांची फिरकी घेतली. हा वाद आता शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत किंचित घट.. २४ तासांत २ हजार ७४८ रुग्णांची नोंद