ETV Bharat / city

मिलिंद देवरांच्या कामकाजाची सुरुवात होणार विविध धर्माच्या देव दर्शनाने

माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकण्यात आली आहे. मिलिंद देवरा हे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी विविध धर्म-पंथाच्या देवदर्शनाने स्वीकारणार आहेत.

माजी खासदार मिलिंद देवरा
author img

By

Published : Mar 26, 2019, 11:58 AM IST

Updated : Mar 26, 2019, 12:24 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची माळ माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या गळ्यात टाकण्यात आली आहे. देवरा हे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी विविध धर्म-पंथाच्या देवदर्शनाने स्वीकारणार आहेत. त्यासाठी आज सकाळपासून ते देवदर्शन आणि महापुरुषांना अभिवादन करत आहेत.

माजी खासदार मिलिंद देवरा

मागील काही महिन्यापर्यंत लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सकारात्मक नसलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांना काँग्रेसने काही दिवसापूर्वी उमेदवारी जाहीर केली होती. आता त्यांना मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून निवडणुकीच्या काळातच एकाच वेळी दुहेरी लाभ पक्षाने मिळवून दिला आहे.

सकाळी आठ वाजतापासून ते अकरा वाजेपर्यंत मिलिंद देवरा हे विविध धर्म पंथ यांच्या देवदर्शनासाठी निघाले आहेत. सकाळी आठ वाजता त्यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेणार घेतले. तर त्यानंतर शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी भेट दिली. त्यानंतर ते माहीम येथे असलेल्या मगदूम शाहबाबा दर्ग्याला जाऊन तेथे चादर चढवणार आहेत.

माहीम येथेच असलेल्या सेंट मायकल चर्चलाही ते भेट देणार आहेत. शेवटी वाळकेश्वर येथे असलेल्या बाबू अमीचंद पनाला या जैन मंदिराला भेट देऊन ते दर्शन घेणार आहेत. सिद्धिविनायकपासून ते वाळकेश्वर येथील जैन मंदिराच्या देवदर्शनानंतर देवरा हे कुपरेज स्टेडियममध्ये असलेल्या पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून ते आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कामाला सुरुवात करणार आहेत.
सायंकाळी इतर कार्यक्रमासोबत देवरा हे आपला मतदारसंघ असलेल्या गीता नगर, नेव्ही नगर, मच्छीमार नगर, कफपरेड महात्मा ज्योतिबा फुले नगर, शिवशक्ती नगर या पट्ट्यात जाऊन ते आपल्या मतदारांना भेटणार असल्याची माहितीही देवरा यांच्या वतीने देण्यात आली आहे.

Intro:मिलिंद देवरांच्या कामकाजाची सुरुवात विविध धर्माच्या देव-दर्शनाने

Body:मिलिंद देवरांच्या कामकाजाची सुरुवात विविध धर्माच्या देव-दर्शनाने

(फाईल फुटेज वापरावेत)

मुंबई, ता. 26 :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची माळ गळ्यात पडलेले माजी खासदार मिलिंद देवरा हे आपल्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी उद्या सकाळी विविध धर्म-पंथाच्या देवदर्शनाने करणार आहेत. त्यासाठी त्यांनी उद्या मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून देवदर्शन आणि महापुरुषांच्या अभिवादनाचा कार्यक्रम आखला आहे.
मागील काही महिन्यापर्यंत लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सकारात्मक नसलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांना काँग्रेसने काही दिवसापूर्वी उमेदवारी जाहीर केली होती. आता त्यांना मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून एकाच वेळी दुहेरी लाभ निवडणुकीच्या काळातच पक्षाने मिळवून दिला आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत मिलिंद देवरा हे विविध धर्म पंथ यांच्या देवदर्शनासाठी जाणार आहेत.सकाळी आठ वाजता ते प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेणार आहेत.तर त्यानंतर शिवाजी पार्क येथे जातील. येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यानंतर त्यांचा कार्यक्रम दादर शिवाजी पार्क येथेच असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाला (चैत्यभूमी)ते भेट देणार आहेत. तर त्यानंतर माहीम येथे असलेल्या मगदूम शाहबाबा दर्ग्याला जाऊन तेथे चादर चढवणार आहेत.
माहीम येथेच असलेल्या सेंट मायकल चर्चला भेट देणार आहेत आणि सर्वात शेवटी वाळकेश्वर येथे असलेल्या बाबू अमीचंद पनाला या जैन मंदिर आला भेट देऊन येथे देवदर्शन करणार आहेत.
सिद्धिविनायकपासून ते वाळकेश्वर येथील जैन मंदिराच्या देवदर्शनानंतर देवरा हे कुपरेज स्टेडियम मध्ये असलेल्या पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून ते आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कामाला सुरुवात करणार आहेत. याच क्षणापासून ते खऱ्या अर्थाने ते आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कामकाजाला सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात आले.

सायंकाळी इतर कार्यक्रमासोबत देवरा हे आपला मतदारसंघ असलेल्या गीता नगर, नेव्ही नगर, मच्छीमार नगर, कफपरेड महात्मा ज्योतिबा फुले नगर, शिवशक्ती नगर या पट्ट्यात जाऊन ते आपल्या मतदारांना भेटणार आहेत.

Conclusion:मिलिंद देवरांच्या कामकाजाची सुरुवात विविध धर्माच्या देव-दर्शनाने
Last Updated : Mar 26, 2019, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.