मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या विरोधात मुंबई काँग्रेस ( Mumbai Congress ) आक्रमक झाली आहे. आज (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष कुर्डूवाडी ते सायन कोळीवाडापर्यंत ( Kurduwadi to Sion Koliwada ) एकत्र आले. मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी अमित शेट्टी ( Mumbai Congress General Secretary Amit Shetty ) यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते आणि प्रवासी मजूर जमा झाले होते. याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 2021 मध्ये लोकडाऊन घोषित केल्यानंतर लोकांना जेवण तसेच गावी जाण्यासाठी काँग्रेस पक्षानेच मदत केली. पंतप्रधानांनी खोटं बोलू नये, अशी प्रतिक्रिया कर्नाटकच्या स्थलांतरीत मजूर लता गौडा यांनी दिली आहे.
'आम्हाला काँग्रेसने मदत केली'
पंतप्रधानांनी खोटं बोलू नये. लॉकडाऊन वेळी आमच्या घरातील लोकं आजारी होते, आम्हाला घरी जायचे होते. परंतु भाजपाने कोणतीही मदत केली नाही. आमच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अशावेळी काँग्रेसने आम्हाला मदत केली. पंतप्रधानांनी काल संसदेमध्ये काँग्रेसमुळे महाराष्ट्रात कोरोना पसरला, असे वक्तव्य केले होते. त्या विरोध काँग्रेस आक्रमक होत रस्त्यावर उतरली आहे. 2021 मध्ये लोकडाऊन घोषित केल्यावर लोकांना जेवण तसेच गावी जाण्यासाठी काँग्रेस पक्षानेच मदत केली, असे कर्नाटकच्या स्थलांतरीत मजूर लता गौडा यांनी सांगितले.
'काँग्रेसने निभावला माणुसकीचा धर्म'
या संदर्भात बोलताना मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी अमित शेट्टी म्हणाले, की पंतप्रधान खोटं बोलत आहेत. ज्यावेळी लोकांना गरज होती, त्यावेळी त्यांच्यासाठी काँग्रेसने मदत केली. काँग्रेसने नेहमीच माणुसकीचा धर्म निभावला आहे. अशा खोटारड्या पंतप्रधानांचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली आहे.
हेही वाचा - Malik Criticism of PM Modi : देशात कोरोना पसरण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार -नवाब मलिक