ETV Bharat / city

म्हाडाचे मुंबई मंडळ घर सोडतीच्या तयारीत - मुंबई म्हाडा

सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरांचे स्वप्न म्हाडा अनेक वर्षापासून पूर्ण करत आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून या सोडतीत खंड पडला आहे. २००८ पासून २०१९ पर्यंत सलग १२ वर्षे निघणाऱ्या मुंबईतील सोडतीत कधीही ब्रेक लागला नाही. कोकण मंडळ आणि देखील दसऱ्या च्या बोलता बर लॉटरी काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता मुंबई मंडळाकडून मात्र सोडत काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे.

म्हाडा मुंबई
म्हाडा मुंबई
author img

By

Published : Jul 31, 2021, 7:46 PM IST

मुंबई - सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्यासाठी म्हाडाची ओळख आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून मुंबईतील म्हाडाच्या घरांची एक देखील लॉटरी निघाली नाही. मात्र ज्यांना स्वतःचे घर घ्यायचे आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. आता मुंबई जवळ परवडणाऱ्या किमतीत हक्काचे घर घेण्याची संधी काही महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे. अँटॉप हिलमधील ४५० आणि गोरेगाव पहाडी येथील २६८३ घरांसाठी २०२२ मध्ये सोडत काढण्याचा मुंबई मंडळाचा विचार आहे. तर घरांचा आकडा वाढवण्यासाठी ही मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.

सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरांचे स्वप्न म्हाडा अनेक वर्षापासून पूर्ण करत आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून या सोडतीत खंड पडला आहे. २००८ पासून २०१९ पर्यंत सलग १२ वर्षे निघणाऱ्या मुंबईतील सोडतीत कधीही ब्रेक लागला नाही. कोकण मंडळ आणि देखील दसऱ्या च्या बोलता बर लॉटरी काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता मुंबई मंडळाकडून मात्र सोडत काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे.

गोरेगाव पहाडी येथे मुंबई मंडळाचा ड्रीम प्रोजेक्ट सुरू

यामध्ये अत्यल्प गटातील १९४७ घरे बांधण्यात येत आहेत. ३२० ते ३३० चौ फुटांची ही घरे असणार आहेत. तर अल्प गटातील ७३६ घरांचे काम सुरू असून ही घरे ४८० ते ५९० चौ फुटांची आहेत. २३ मजली चार टॉवरमध्ये ही घरे आहेत. अँटॉप हिल येथे संक्रमण शिबिराच्या माध्यमातून मुंबई मंडळाला सुमारे ४५० घरे उपलब्ध झाली असून ही घरे ३०० चौ फुटांची आहेत. तर २०२२ मध्ये मुंबईतील घरांसाठी सोडत काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. अँटॉप हिलमधील ४५० आणि गोरेगाव पहाडी येथील २६८३ घरांचा यात समावेश असेल. तर आणखी काही घरे वाढविण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत असे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.