ETV Bharat / city

म्हाडाच्या अधिकाऱ्याने लाटले सात फ्लॅट?, कोकण मंडळाचे चौकशीचे आदेश - मुख्य अधिकारी नितीन महाजन

सर्वसामान्याना परवडणाऱ्या दरात घरे देण्यासाठी म्हाडाकडून घरे बांधली जात आहेत. मात्र यातील काही घरांचा लाभ सर्वसामान्यांऐवजी म्हाडातील अधिकारीच घेत आहेत. याचे उदाहरण आता समोर आले आहे.

mhada-official-looted-seven-flats
म्हाडाच्या अधिकाऱ्याने लाटले सात फ्लॅट?
author img

By

Published : Mar 4, 2021, 8:02 PM IST

मुंबई - सर्वसामान्याना परवडणाऱ्या दरात घरे देण्यासाठी म्हाडाकडून घरे बांधली जात आहेत. मात्र यातील काही घरांचा लाभ सर्वसामान्यांऐवजी म्हाडातील अधिकारीच घेत आहेत. याचे उदाहरण आता समोर आले आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून कल्याण खोणी प्रकल्पातील सात घरे म्हाडातील एका महिला अधिकाऱ्याने लाटल्याचा आरोप झाला आहे. तशी तक्रार स्थानिक आमदार राजू पाटील यांनी म्हाडाकडे केली आहे. या तक्रारीची कोकण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून 15 दिवसात यासंबंधीचा अहवाल सादर होईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती कोकण मंडळ म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली आहे.

7 नातेवाईकांना लागली लॉटरी-

खोणी येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कल्याण, खोणी येथे गरिबांसाठी घरे बांधण्यात येत आहेत. या घरांसाठी लवकरच लॉटरी काढण्यात येणार आहे. असे असताना खोणीतील गोल्डन ड्रीम प्रोजेक्ट, आर्चीड इमारतीतील 7 घरे म्हाडातील एका अधिकाऱ्याच्या नातेवाईकांना लिलावाद्वारे मिळाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. दरम्यान छाया राठोड, असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. छाया राठोड यांच्या बहिणीचा नवरा कुलदीप चव्हाण, चुलतभाऊ दया राठोड, बहिणीची नणंद वर्षा आडे, सावत्रभाऊ वसंत राठोड, सख्खा भाऊ महेश राठोड, वडील वामन राठोड आणि नातेवाईक मोरेश्वर जाधव अशा 7 जणांनी ही घरे मिळाली आहेत. एकाच घरातील व्यक्तींना इतकी घरे कशी लागू शकतात. हा घोटाळा असून आपल्या पदाचा गैरवापर करत ही घरे लाटल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. तर याची रीतसर तक्रार त्यांनी म्हाडा उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्याकडे केली आहे.

कडक कारवाई होणार-

म्हाडा अधिकारी आणि दलाल संगनमताने घरे लागतात, असा आरोप सतत होतोच. पण आता नातेवाईकांनाही घरे मिळून देत असल्याचे समोर आले आहे. ही बाब गंभीर असून या प्रकरणाची उच्च स्तरावर चौकशी करण्याची तसेच दोषींना निलंबित करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. त्यानुसार याविषयी महाजन यांना विचारले असता त्यांनी अशी तक्रार आली आहे आणि आम्ही याची गंभीर दखल घेतली आहे, असे महाजन यांनी सांगितले आहे. तर 15 दिवसात या प्रकरणाची चौकशी करत अहवाल देण्यात येईल. यात जे कुणी दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा- अनुराग-तापसी रडारवर; आयकर विभागाकडून २८ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.