ETV Bharat / city

म्हाडाच्या दुकानांचा पहिल्यांदाच होणार 'ऑनलाईन' लिलाव - मुंबई

म्हाडा लिलावासाठी पहिल्यांदाच डिजिटल व्यासपीठाचा वापर करणार आहे. म्हाडाच्या कोकण आणि मुंबई मंडळांच्या 274 दुकानांचा 'ई' लिलाव होणार आहे.

माहिती देताना म्हाडाचे अधिकारी
author img

By

Published : May 17, 2019, 3:01 PM IST

मुंबई - म्हाडाच्या कोकण आणि मुंबई मंडळांच्या 274 दुकानांचा 'ई' लिलाव होणार आहे. म्हाडा लिलावासाठी पहिल्यांदाच डिजिटल व्यासपीठाचा वापर करणार आहे. तब्बल 9 वर्षांपासून या दुकानांचा लिलाव रखडलेला होता.

माहिती देताना म्हाडाचे अधिकारी
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 27 मे आहे. या दुकानांसाठी ई-टेंडर जाहिरात 30 मार्चला प्रसिद्ध झाली आहे. या सोडतीत 29 मे ते 31 मे च्या दुपारी 2 वाजेपर्यंत ऑनलाईन बोली खुली आहे.

म्हाडाकडून उपलब्ध केल्या जाणाऱ्या दुकानांसाठी स्वतंत्रपणे सोडत जाहीर होते. त्यातील जाहिरातीनुसार नोंदणी, ऑनलाईन अर्ज दाखल करणे, कागदपत्रे डाउनलोड करण्यासारख्या तांत्रिक गोष्टींसाठी 27 मे पर्यंतची अंतिम मुदत आहे.
म्हाडाने 2010 मध्ये 168 दुकानांच्या विक्रीची जाहिरात दिली होती. त्यानंतर तब्बल 9 वर्षाचा कालावधी लागला. या ऑनलाईन सोडतीत जादा बोलीनुसार दुकानांचा ताबा देण्यात येणार आहे.

म्हाडा नियमानुसार अर्जदारास जाहिरातीतील दुकानांच्या किंमतीच्या एक टक्का रक्कम अनामत रक्कम म्हणून अर्जदारास भरावी लागणार आहे. आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त जणांनी अर्ज भरला असून 700 पेक्षा जास्त जणांनी अनामत रक्कम जमा केली आहे.

या ई-लिलावात सायन-प्रतीक्षानगर येथे 35 दुकाने, मालाड-मालवणी येथे 69, गव्हाणपाडा-मुलुंड, विनोबा भावेनगर कुर्ला, गोरेगाव येथे दुकाने आहेत. कोकण मंडळाची विरार-बोळींज, वेंगुर्ले येथे दुकाने आहेत. विजेत्यांनी पालिकेच्या आरक्षणाप्रमाणेच दुकानांच्या वापर करणे अपेक्षित आहे.

Intro:मुंबई ।
म्हाडाच्या कोकण आणि मुंबई मंडळांच्या 274 दुकानांचा 'ई' लिलाव होणार आहे. म्हाडा लिलावासाठी पहिल्यांदाच
डिजिटल व्यासपीठाचा वापर करणार आहे. तब्बल ९ वर्षे ही दुकाने रखडलली होती.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २७ मे आहे. या दुकानांसाठीची ई-टेंडर जाहिरात ३० मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. या सोडतीत २९ मे ते ३१ मे दुपारी २ वाजेपर्यंत ऑनलाइन बोली खुली आहे.
Body:म्हाडाकडून उपलब्ध केल्या जाणाऱ्या दुकानांसाठी स्वतंत्रपणे सोडत जाहीर होते. त्यातील जाहिरातीनुसार नोंदणी, ऑनलाइन अर्ज दाखल करणे, कागदपत्रे डाउनलोड करण्यासारख्या तांत्रिक गोष्टींसाठी २७ मे पर्यंतची अंतिम मुदत आहे.
म्हाडाने २०१० सालामध्ये १६८ दुकानांसाठी विक्रीची जाहिरात दिली होती. त्यानंतर तब्बल ९ वर्षाचा कालावधी लागला. या ऑनलाईन सोडतीत जादा बोलीनुसार दुकानांचा ताबा देण्यात येणार आहे.

म्हाडा नियमानुसार अर्जदारास जाहिरातीतील दुकानांच्या किंमतीच्या एक टक्का रक्कम अनामत रक्कम म्हणून अर्जदारास भरावी लागणार आहे. आतापर्यत 2500 पेक्षा जास्त जणांनी अर्ज भरला असून 700 पेक्षा जास्त जणांनी अनामत रक्कम जमा केली आहे.

या इ लिलावात सायन-प्रतीक्षानगर येथे ३५ दुकाने, मालाड-मालवणी येथे ६९, गव्हाणपाडा-मुलुंड, विनोबा भावेनगर कुर्ला, गोरेगाव येथे दुकाने आहेत. कोकण मंडळाची विरार-बोळींज, वेंगुर्ले येथे दुकाने आहेत. विजेत्यांनी पालिकेच्या आरक्षणाप्रमाणेच दुकानांच्या वापर करणे अपेक्षित आहे.

बाईट

विकास देसाई, वित्तनियंत्रकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.