ETV Bharat / city

Shivsena leader Sudhir Joshi death : शिवसेना नेते सुधीर जोशी पंचतत्वात विलीन

सुधीर जोशी यांचं पार्थिव दादर पश्चिमेकडील पारिजात इमारतीत अंतिम दर्शनासाठी ( Shivsena leader Sudhir Joshi death )  ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी आदरांजली वाहिली.

sudhir joshi
sudhir joshi
author img

By

Published : Feb 18, 2022, 3:52 PM IST

Updated : Feb 18, 2022, 4:35 PM IST

मुंबई - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, मुंबईचे दुसरे महापौर आणि माजी महसूलमंत्री सुधीर जोशी ( Shivsena leader Sudhir Joshi death ) यांचे वयाच्या 81 व्या वर्षी गुरुवारी निधन झाले. दादर शिवाजी पार्क येथील किर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar ), स्थानिक आमदार सदा सरवणकर आदी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुधीर जोशी अंत्ययात्रा
सुधीर जोशी यांचं पार्थिव दादर पश्चिमेकडील पारिजात इमारतीत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे आमदार, खासदार, नेते, उपनेते आणि पदाधिकारी दर्शन घेत आदरांजली वाहिली. मुंबई पोलिसांकडून यावेळी शासकीय मानवंदना देण्यात आली. सुधीर जोशींच्या अंत्ययात्रेला यानंतर सुरुवात झाली. शिवसेना शाखा क्रमांक 191 आणि शिवसेना भवन येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी थांबवण्यात आले. सुधीर भाऊ अमर रहे, अशा घोषणा देण्यात आल्या. अनेकांचे कंठ यावेळी दाटून आले. शिवाजी पार्क किर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

बाळासाहेबांचे जवळचे सहकारी

शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात पक्षबांधणीसाठी जोशी ( Balasaheb Supporters death in Mumbai ) यांचे मोठे योगदान मानले जाते. जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते, असे मानले जाते. कॅबिनेट मंत्री पदासह त्यांनी अनेक पद भूषवली. मुंबईचे दुसरे महापौर म्हणून जोशी यांचे नाव घेतले जाते.

हेही वाचा - ED arrests Iqbal Kaskar : दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकर मुंबई सत्र न्यायालयात दाखल

शिवसेनेचे मोठे नुकसान - अनिल देसाई

सुधीर भाऊ यांच्या जाण्याने शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे. एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेल्याची भावना शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केली.

सुधीर जोशी उत्तम संघटक, अभ्यासू नेते - राज्यपाल

माजी मंत्री आणि मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी उत्तम संघटक तसेच अभ्यासू व लढवय्ये नेते होते. त्यांच्या निधनाबद्दल दुःख होत, असल्याची शोक भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केली. कामगार तसेच स्थानिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. मुंबईचे महापौर, विधान परिषद सदस्य, विरोधी पक्षनेते व राज्याचे मंत्री या नात्याने त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबिय व चाहत्यांना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

आज मी भाचा, मित्र गमावला - मनोहर जोशी
मनोहर जोशी श्रद्धांजली देतांना भावुक झाले होते. सुधीर माझा भाचा, मित्र आज आपल्यात राहिला नाही. माझे आयुष्य घडविण्यात त्याचा मोठा वाटा होता. तो माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होता. त्याने माझ्यासोबत एकत्र काम केले होते, असेही मनोहर जोशींनी सांगितले.

हेही वाचा - Shivsena Leader Sudhir Joshi : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन

Last Updated : Feb 18, 2022, 4:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.