ETV Bharat / city

परमबीर सिंग यांच्या पत्रावर स्वाक्षरी नाही; ईमेलसह पत्राबाबत शहानिशा सुरू- मुख्यमंत्री कार्यालय - मुख्यमंत्री कार्यालय प्रतिक्रिया न्यूज

मुख्यमंत्री कार्यालयाला paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेले पत्र मिळाले आहे. हा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

Chief Minister of Maharashtra
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Mar 20, 2021, 10:40 PM IST

मुंबई - परमबीर सिंग यांनी पाठविलेल्या पत्रावरून राज्यातील वातावरण तापले असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्राची खातरजमा करण्यात येत आहे. गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर शनिवारी दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. मात्र, त्यावर केवळ नाव लिहिलेले असून त्यावर स्वाक्षरी नाही. पत्र हे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच पाठविले की नाही, याबाबत शहानिशा सुरू असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाला paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेले पत्र मिळाले आहे. हा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे परमबीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे.

वास्तविक पाहता परमबीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे. त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा-परमबीर सिंग यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार- अनिल देशमुख

काय म्हटले आहे परमबीर सिंग यांनी पत्रात?

परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या कथित आरोप केलेला आहे की मुंबई पोलीस खात्यामध्ये पुन्हा सामावून घेण्यात आलेल्या सचिन वाझे या अधिकाऱ्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानावर बोलावून घेतले होते. या दरम्यान त्यांनी सचिन वाझे यांना सांगितले होते की मुंबईत 1, 750 बार असून प्रत्येक बारकडून 2 ते 3 लाख रुपयांची वसुली दर महिन्याला केल्यास 40 ते 50 कोटी रुपयांचा टार्गेट हे पूर्ण केले जाऊ शकते. उरलेले 50 कोटींच्या टार्गे साठी इतर माध्यमातून प्रयत्न करावा लागेल, असे सांगून दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास त्यांना सांगण्यात आल्याचा आरोप परमवीर सिंग यांनी केला आहे. यासंदर्भात परमवीर सिंग यांनी मला येऊन सांगितले असता याबद्दलची माहिती मला मिळाली असल्याचा दावा परमबीर सिंग यांनी कथित पत्रात केला आहे.

हेही वाचा-परमबीर सिंग यांचे कथित पत्र; शरद पवार-जयंत पाटील यांच्यात फोनद्वारे चर्चा

गृहमंत्र्यांनी फेटाळले आरोप-

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी पोलीस आयुक्त सिंग यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले की, परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे. मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रावरून राज्याच्या राजकारणात वातावरण तापले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.