मुंबई हल्ली चित्रपटांमध्ये आशयाला महत्व आले आहे. प्रादेशिक भाषांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले जात असताना हिंदी चित्रपटही कथानकाकडे लक्ष देऊ लागले आहेत. आपला चित्रपट आणि त्यातील मांडलेली समस्या संपूर्ण भारतात पोहोचावी, म्हणून अभिनेत्री रीना जाधव निर्मात्या बनल्या आणि त्यांनी ‘मेरिट ॲनिमल’ ची निर्मिती केली Reena Jadhav produced Merit Animal आहे. चित्रपट एका अतिशय महत्त्वाच्या सामाजिक समस्येकडे लक्ष वेधतो. पालक आपल्या मुलांवर ‘मेरिट’ मध्ये येण्यासाठी प्रचंड दबाब टाकताना दिसतात. परंतु त्याचा मुलांच्या मानसिक स्थितीवर होणार आघात विचारात घेतला जात नाही. त्यावर प्रकाशझोत टाकताना पालकांना मोलाचा सल्ला देण्याचे काम ‘मेरिट ॲनिमल’ मधून केले गेले आहे.
या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट international film festival महोत्सवांमध्ये प्रेक्षकांची तसेच ज्युरींची मने जिंकली आहेत. चित्रपटाने इस्तंबूल चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) - युरोप चित्रपट महोत्सव, सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी चित्रपट - टोकियो चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट - आवृत्ती स्प्रिंग सिनेफेस्ट, इंडो फ्रेंच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, अहमदाबाद बालचित्रपट महोत्सव, दरभंगा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. फिल्म फेस्टिव्हल, सहरसा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, म्युझियम टॉकीज फिल्म फेस्टिव्हलमध्येही अधिकृत निवड झाली आहे.
आपली सुप्त स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पालकांचा मुलांवर सर्वोत्तम होण्याचा भार मेरिट ॲनिमल वरुण नावाच्या मुलाभोवती फिरते. वरुणच्या पालकांना त्याने सर्व विषयांत आणि इतर गोष्टींत सर्वाधिक गुण मिळवावेत अशी इच्छा आहे. शहराच्या सीमेवर असलेल्या टेकडीवर सायकल रेसिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असते. शर्यत सुरू होणार असतानाच वरुण गायब होतो. चित्रपटाची कथा समाजातील गंभीर समस्येवर प्रकाश टाकते. प्रत्येकाला या शर्यतीत अव्वल व्हायचे असते, पण यादरम्यान निरागस बालपणाकडे दुर्लक्ष होते. आपली सुप्त स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पालक मुलांवर सर्वोत्तम होण्याचा भार टाकतात, जो त्यांच्यासाठी खरोखरच एक मानसिक दबाव असतो.
प्रदीप देशमुख आणि रीना जाधव निर्मित, मेरिट ॲनिमल या चित्रपटाचे दिग्दर्शन जुनेद इमाम यांनी राजराजेश्वर फिल्म्स आणि महालक्ष्मी सिनेव्हिजनच्या बॅनरखाली केले आहे. चित्रपटाचे संगीत रोहित नागभिडे यांनी दिले. गीतलेखन वैभव देशमुख यांनी केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रकार गिरीश जांभळीकर आणि कुणाल श्रीगोंदेकर आहेत. या चित्रपटात रीना जाधव, मंगेश नाईक, आदित्य सिंघल, महेश चग, बहार उल इस्लाम आणि भाग्यरतीबाई कदम यांच्या भूमिका आहेत.
अभिनेत्री रीना जाधव म्हणाल्या, "ही कथा आजच्या शिक्षण व्यवस्थेवरचा प्रश्न नसून ती पालकांच्या आपल्या मुलांकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा यावर परखडपणे भाष्य करते. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुलांवर आपल्या आकांक्षांचे ओझे टाकतात. गुणवत्तेच्या या शर्यतीत प्रत्येकजण अव्वल येऊ शकत नाही. बालमनावर होणाऱ्या मानसिक आघातांकडे दुर्लक्ष होते. मेरिट अॅनिमल हा चित्रपट समाजासाठी डोळे उघडणारा ठरेल. आम्ही हा चित्रपट OTT हंगामावर प्रदर्शित करत आहोत जेणेकरून या सणासुदीच्या हंगामात हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांना पाहायला Merit Animal ready for exhibition in India मिळेल.”
‘मेरिट ॲनिमल’ हा चित्रपट सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सिनेमागृहांमध्ये तसेच आघाडीच्या OTT प्लॅटफॉर्म MX Player आणि Hungama वर प्रदर्शित होईल. Merit Animal after winning the international film festival ready for exhibition in India
हेही वाचा राणी मुखर्जीच्या घरी मुलगी अदिराच्या वाढदिवसाची पार्टी, स्टार-किडसची उपस्थिती