ETV Bharat / city

Sanjay Raut On BJP : मेहबुबा मुफ्ती भाजपच्या चांगल्या मैत्रिण; संजय राऊतांची फटकेबाजी - Mehbooba Mufti vs Sanjay Raut

जम्मु कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या भाजपच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. (Mehbooba Mufti Good Friend of BJP) त्यांनी अफझल गुरू आणि बुरहान वानी यांना पाठिंबा देऊनही, भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्यासोबत सरकार बनवले होते असा हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांची भाजपवर केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेना नेते संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत
author img

By

Published : Mar 27, 2022, 12:23 PM IST

मुंबई - जम्मु कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या भाजपच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. अफझल गुरू आणि बुरहान वानी यांना पाठिंबा देऊनही, भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्यासोबत सरकार बनवले होते. (Mehbooba Mufti vs Sanjay Raut) तसेच, आज मुफ्ती जे काही बोलत आहेत त्याला भाजप जबाबदार आहे अशी थेट प्रतिक्रिया देत आमचा पक्षाचा याला कायम विरोध असणार आहे असही शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.

  • Mehbooba Mufti has been a good friend of the BJP. Despite her supporting Afzal Guru & Burhan Wani, BJP made govt with her in J&K. BJP is responsible for whatever Mufti is saying today. Our party will continue opposing it: Shiv Sena leader Sanjay Raut pic.twitter.com/K1Xfa0jgtQ

    — ANI (@ANI) March 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अशा गठबंधणाला कायम विरोध - अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti Statement) यांच्यासोबत भाजपने सत्ता उपभोगली. त्याच काळात काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या असा घणाघातही राऊत यांनी केला आहे. तसेच, भाजपनेच मेहबुबा मुफ्ती यांना बळ दिले आहे, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला आहे. परंतु, आमचा अशा गठबंधणाला कायम विरोध राहीला आहे आणि तो कायम राहील असही राऊत म्हणाले आहेत.

पाकिस्तानसोबत चर्चा करावी म्हणतातयेत - दहशतवादी अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती या कधीकाळी भाजपच्या मैत्रीण होत्या. मेहबुबा यांच्या पार्टीचे चारित्र्य नेहमीच फुटीरतावादी, काश्मीरच्या समर्थनार्थ राहिले आहे. त्यानंतरही भाजपने त्यांच्याशी युती केली. सत्ता उपभोगली. कश्मीरी पंडितांवर त्याच काळात हल्ले झाले. आता त्याच मेहबुबा मुफ्ती काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा करावी म्हणतातयेत. याच मेहबुबा मुफ्ती यांना भाजपनेच बळ दिले आहे असही राऊत म्हलाले आहेत.

मालिक तो महान है - मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तीने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे (24 पैकी 22)तास काम करतात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे. आता म्हणे मोदी यांना ती 2 तासांची झोप मिळू नये म्हणून संशोधन सुरू आहे. हे ऐकूण पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही झोप उडेल. बाकी, कोणीच काम करत नाही. बायडेन, झेलन्स्की, पुतिन, सारे बिनकामाचे आहेत. मालिक तो महान है, बस चमचों से परेशान है, असा टोलाही त्यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

हिंदुत्वावरून लागली चढाओढ- भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर खरा हिंदुत्ववादी कोण, यावरून या दोन्ही पक्षात चढाओढ लागली आहे. मात्र, मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने जम्मू आणि काश्मीरमध्ये केलेली युती आणि उपभोगलेली सत्ता यावरून शिवसेनेने नेहमीच भाजपवर तोंडसुख घेतले आहे. 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावरून सध्या देशभरात राजकारण सुरूय. त्यानंतर आता त्याचा उल्लेख करत आज राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्ला केला आहे.

हेही वाचा - Oscars Awards 2022 : एंजेलिसमध्ये आज ऑस्कर पुरस्कार सोहळा;वाचा लाईव्ह कुठे पाहता येणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.