ETV Bharat / city

Sunday Mega Block : रविवारी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक! - लोकल मेगाब्लॉक

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ७ नोव्हेंबर २०२१ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार आहे.

local
फाईल फोटो
author img

By

Published : Nov 5, 2021, 10:26 PM IST

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ७ नोव्हेंबर २०२१ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरुळ अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक-

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक रविवारी सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत असणार आहे. या मेगालॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक-

मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक कालावधीत ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.१९ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेल करीता सुटणा-या आणि पनवेल/नेरूळ/वाशी येथून सकाळी १०.१५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याच्या सुटणाऱ्या अप सेवा बंद राहतील. मेन लाईनवर मेगाब्लॉक असणार नाही

या मार्गावरून करा प्रवास-

ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, यामुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.